टीम तरुणाई तर्फे शालेय साहित्याचे वाटप

296

 

प्रतिनिधि/ मंदार बावनकर
दखल न्युज भारत टीम नागपुर

मौदा-नागपुर

लॉक डाउन मुळे कित्तेक मंजूर लोकांची परिस्थिति फार दयनीय झाली आहे.अश्या परिस्थितित बहुतांश मुले शालेय साहित्या पासून वंचित राहत आहे.या करिता टीम तरुणाई ने
दिनांक ०५/०८/२०२० रोजी नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात विविध ७ शाळांमध्ये तरुणाईच्या प्रोजेक्ट कदम अंतर्गत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम राज्य समन्वयक श्री सागर दुधाने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समन्वयक कुंदलाल भोयर यांच्या नेतृत्वात संपन्न झाला. कार्यक्रमाकरीता महादुला, मोहाडी, बोरगाव, घोटमुनढरी,ढोलमारा, सुंदरगाव, मांगलि(तेली) या गावातील सरपंच, मुख्याध्यापक तसेच सागर गभणे, श्रेयस गुल्हाणे, चंदलाल भोयर, संदीप चौधरी, दुर्योधन बोरकर, महेश कुकडे, सचिन नगदेवे, शुभम मेहेर, नानू चोपकर, ज्ञानेश्वर मानकर, नीलेश डोंगरे, अर्चना धोत्रे, अमोल भोयर, शाहरुख शेख, मीनल वाघमारे, जितेंद्र भोयर, सतीश देवारे यांचे सहकार्य लाभले.