महादुला नगरपंचायत येथे 5 दिवसांच्या गैपनंतर आढळले 2 कोरोना पाँजिटीव अजुनही एरिया सील न केल्याबद्दल नागरिकांत तीव्र नाराजी

956

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

महादुला नगरपंचायत / नागपुर:6 आँगस्ट 2020
तब्बल 5 दिवसांच्या गैपनंतर महादुला झेंडा चौकात एक युवक व त्याची आई आज पाँजिटीव आढळली आहे.
सकाळी 10-11 च्या दरम्यान हा 40 वर्षिय युवक पाँजिटीव आढळला. तेव्हा नगरपंचायत चे कर्मचारी यांनी त्या युवकाचे फक्त घरीच सेनिटायजर केले मात्र आजुबाजु च्या 500 मीटर सभोवताली सैनिटायझर केले नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
सकाळ पासून पेशंट आढळुनही सायंकाळच्या 5 वाजेपर्यंत पेशंट घरीच आहे त्यामुळे तेथील वार्डातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या युवकाच्या घरच्या लोकांची कोरोना टेस्ट घेतली असता त्याची 60 वर्षिय आईसुद्धा पाँजिटीव असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मागील 2 महिन्यापासून वार्डात सेनिटायजर फवारणी झाली नाही तसेच अद्याप ही येथील नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरपंचायत प्रशासन कर्मचारी या ठिकाणी का आले नाही आमच्या जीवनाची त्यांना कोणतीच काळजी नाही का? असा या नागरिकांनी आरोप केला आहे. तसेच त्यातील काही महिलांनी यासंदर्भात कोराडी पोलिसांना फोन करून तक्रार केल्यानंतर दोन शिपाई घटनास्थळी आलेत मात्र हे एरिया सील करणे आमचे काम नाही आहे. आमचेच दोन पोलीस मरण पावले आम्हाला कशाला फोन करता असे नागरिकांनाच ते तंबी देऊ लागले.
गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राऊत यांनी दखल न्युज भारत पोर्टल शी बोलताना सांगितले की जागेअभावी आज आम्ही त्यांना कुठे शिफ्ट करु शकलो नाही पण उद्या आम्ही या दोघांनाही वारेगाव येथील कोव्हीड सेंटरला उपचारासाठी दाखल करु. महादुला नगरपंचायत प्रशासनाने आता तरी जागे व्हावे व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करुन नागरिकांना धाडस बांधावे… हीच अपेक्षा.