आॅल सेंट्स हायस्कुलच्या छोट्या बालकांनी गिरवले योगाचे धडे

394

 

दिलीप अहिनवे
मुंबई महानगर प्रतिनिधी
‘दखल न्युज भारत’

कल्याण, दि. ६ : कोरोनामुळे शाळा बंद आहेत परंतु शिक्षण सुरु आहे. भिवंडी तालुक्यात आॅल सेंट्स हायस्कूल ही इंग्रजी माध्यमाची नामांकित शाळा आहे. दर्जेदार शिक्षण देण्यात शाळेचा नावलौकिक आहे. क्रीडाक्षेत्रात शाळेची प्रगती नेहमीच वाखाणण्याजोगी असते. अभ्यासात तर नवनवीन उच्चांक रचले जात आहे.

शारीरिक शिक्षण शिक्षिका स्वाती धुरी यांनी ५ आॅगस्टला इयत्ता तिसरीसाठी आॅनलाईन शारीरिक शिक्षण तासिका घेतली. आज मुले एकदम खुष दिसत होती. वही पुस्तकाला आराम देऊन व्यायामाला सुरुवात झाली. सोप्या व सुटसुटीत प्रास्ताविक हालचाली घेण्यात आल्या. उभ्या आसनांपैकी उंची वाढण्यासाठी उपयुक्त असे ताडासन घेतले. लहान मुलांना शरीराचा तोल सांभाळण्यासाठी भिंतीवरील कुठल्याही एका बिंदुवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. बैठ्या आसनांपैकी वज्रासन घेण्यात आले. मोठ्या माणसांपेक्षा छोट्यांनी वज्रासनात बाजी मारली. लहान मुलांचे अंग लवचिक असल्यामुळे सर्व मुलांनी खुपच सुंदर कृती केली. शेवटी सुखावह बैठक स्थितीत बसण्यास सांगितले. काही मुलांनी पद्मासनात तर काही मूलांनी साधी बैठक घालुन डोळे बंद केले. चंचल स्वभावगुण असणाऱ्या या छोट्या बालकांना एकाग्रता (concentration) वाढवण्यासाठी ही सुखावह बैठक स्थिती खुपचं उपयुक्त आहे. शारीरिक शिक्षण शिक्षिका स्वाती धुरी यांनी प्रत्येक आसनांचे प्रात्यक्षिक, कृती व फायदे सोप्या भाषेत सांगितले. मुलांना सराव करण्यासाठी पुरेसा वेळ दिला. मुलांच्या चुकांची दुरुस्ती करुन योग्य त्या सूचना दिल्या. मुलांसाठी ही पहिलीच शारीरिक शिक्षणाची तासिका खुपच आनंददायी ठरली. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आठवड्याला एक शारीरिक शिक्षण तासिका असावी असे बऱ्याच पालकांचे मत आहे.

आॅल सेंट्स हायस्कुलच्या वतीने मुलांना नियमित आॅनलाईन शिक्षण दिले जात आहे. सर्व शिक्षक उत्कृष्ट ‘तंत्रस्नेही शिक्षक’ आहेत. आॅनलाईन शिक्षण देण्यासाठी अद्ययावत ज्ञान त्यांच्याकडे आहे. शिक्षक वर्ग सर्व मुलांना शिक्षणात सहभागी करुन घेत आहेत. आॅनलाईन शिक्षण मुलांपर्यंत कितपत पोहोचले हे जाणुन घेण्यासाठी शाळेने आॅनलाईन मुल्यमापन चाचणी घेतली. मुलांनी खुपच चांगला प्रतिसाद नोंदवला. मुले सोमवार ते शुक्रवार दूपारी १२ वा. शिक्षण घेण्यासाठी आतूर झालेली असतात. आपल्या आवडत्या शिक्षकांचे चेहरे मोबाईल, लॅपटॉपवर दिसताच ‘गुड आफ्टरनुन मॅम’ बोलुन आनंददायी आॅनलाईन शिक्षणाला सुरुवात होते. अभ्यासासोबत शारीरिक शिक्षण, संगीत, कार्यानुभव, चित्रकला हे विषय तितकेच महत्त्वाचे आहेत. अभ्यासासोबत मनोरंजन, कला व छंद जोपासणे या विषयांशिवाय कठीण आहे.

जवळपास साडे चार महिने मुले घरी अाहेत. त्यांना विचारले कि, शाळा हवी कि घर हवे ? तर मुलांचे सध्याचे उत्तर शाळा हे येत आहे. या परिस्थितीत कमी कालावधीचे आॅनलाईन शिक्षण मुलांसाठी फायदेशीर ठरत आहे.