पोहरा पूर्णा येथील धोकादायक असलेल्या अंगणवाडी इमारतीची चौकशी करुन लहान मुलांना सुरक्षा पुरविण्याची उपसरपंचाची मागणी

अमरावती(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
भातकुली तालुक्यातील पोहरा पूर्णा येथील धोकादायक असलेल्या अंगणवाडी इमारतीची चौकशी करुन लहान मुलांना सुरक्षा पुरविण्यात यावी अशी मागणी ग्रा पं चे उपसरपंच गजानन लांजेवार यांनी केली आहे
पोहरा पूर्णा येथे ज्या जागेवर अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे ती जागा अतिशय दलदलीची असून इमारतीच्या मागे पुरातन मातीची उंच दरळ आहे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे ती दरळ खचली असून त्या दरळची माती पाण्यासह अंगणवाडीच्या इमारतीत आली आहे त्यामुळे अंगणवाडी इमारतीत चिखल पसरलेला आहे
अंगणवाडी इमारतीच्या बाजुला मोठया काटेरी झुडूपांनी वेढा दिलेला आहे काटेरी झुडूपांच्या आश्रयाने येथे सापासारखे सरपटणारे प्राणी यांचा नेहमीच वावर असतो त्यामुळे या अंगणवाडीमध्ये येणाऱ्या लहान मुलांच्या जिवीतवास पूर्णपणे धोका निर्माण झाला आहे भविष्यात जर एखादी अनुचित घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण?
हि बाब अतिशय गंभीर असल्याने धोकादायक असलेली अंगणवाडीची इमारत डिसमेटल करण्याची परवानगी देण्यात यावी व अंगणवाडीत येणाऱ्या लहान मुलांची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी पोहरा पूर्णा ग्रा पं चे उपसरपंच गजानन लांजेवार यांनी अमरावतीच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, अमरावती, बालविकास प्रकल्प अधिकारी पं स भातकुली यांच्याकडे केली आहे