विद्यर्थ्यांना शालेय शुल्क भरण्याकरीता कालावधी द्या प्रितम पाटणकर विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष चंद्रपुर यांची मागणी

181

 

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
दिनांक 05/08/2020 रोजी. *मा श्री विजय वडेट्टीवार मंत्री मदत व पुर्नवसन आपत्ती व्यवस्थापन इतर मागास बहुजन कल्याण विकास व पालक मंत्री, मा जिल्हाअधिकारी जिल्हा कार्यालय चंद्रपूर, मा. मुख्य कार्यालय अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, मा शिक्षणाधिकारी प्राथमिक/ माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांना प्रितम पाटणकर विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष चंद्रपुर यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.
कॉरोन व्हायरस (covid-19 )मुळे मागील काही महिन्यापासून लॉकडाउनमुळे आपल्या देशातील रोजगार ठप्प पडलेला आहे आणि काही भागात तर कॉरोन (covid 19) कहरच आहे त्यामुळे सर्व कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक बनलेली आहे आणि मानवी जीवनाचे शिक्षणमुळे प्रगती होत असल्याने विद्यार्थ्यांना कोणतेही आर्थिक अडचण मुळे शिक्षण घेण्यासाठी त्रास अडचण होणार नाही म्हणून. जिल्हातील सर्व शैक्षणिक व नियम शैक्षणिक शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शुल्क भरण्याकरिता काही महिन्याचे कालावधी मिळावे यासाठी विद्यार्थी सेना चंद्रपुर ने निवेदन दिले आहे.

यावेळी प्रितम पाटणकर(विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर ), उमंग जुनघरे, दिपांशू काडे, गोविल खुणे, अंशुल रणदिवे, अनिमेश मिलमिले, यश उपरे, संदेश उमरे आणि सर्व ग्रुप सदस्य उपस्थित होते.