आरमोरी तालुक्याअंतर्गत ग्रामीण भागात बऱ्या पैकी- दारूने केला कहर! उध्वस्त संसारा मध्ये मुख्यतःकारणीभूत ठरतोय दारू! (अल्कोहल) नावाचा जहर! – याला जबाबदार कोण?

 

दिनेश बनकर
कार्यकारी संपादक
दखल न्युज भारत

आरमोरी प्राप्त माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्या अंतर्गत ग्रामीण भागामध्ये
दारुने बऱ्यापैकी मजल मारलेली आहे. या दारूमुळे ग्रामीण भागातील गोर गरीब कष्टकरी यांचे संसार बऱ्याच प्रमाणात उदवस्त झाल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागामध्ये दारूमुळे अनेक लोकांचे घर उध्वस्त होऊ लागले आहेत. नवरा दारू पिऊन आला कि, पत्नीला अश्लील शिवीगाळ करत असल्याचे सागितले जात आहे. एकीकडे गडचिरोली जिल्हा हा दारूबंद जिल्हा घोषित असून सुद्धा खुले आम दारू विक्री आणि सप्लाय होत असल्याचे बोलल्या जात आहे. याकडे प्रशानाचे लक्ष का नाही? असा प्रश्न आम जनतेकडून होत आहे. यामध्ये प्रशासनाचे सुद्धा हात नाहीना असाही प्रश्न लोकांच्या मनात येतोय? आरमोरी तालुक्यात गेली काही दिवसांपूर्वी दिवसा ढवळया दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि ती ग्रामीण भागात नेऊन विकल्या जात आहे. त्याचा दुष्परिणाम असा कि, दारू पिल्यानंतर जस काही, त्यांच्या अंगात देव शिरतो कि सैतान, अस झालाय त्यामुळे त्यांची आपल्या घरच्या स्त्रियाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतोय आणि भांडण सुरु होत असल्याचे सागीतल्या जात आहे. घर उध्वस्त होण्याला मुख्य कारणीभूत दारू कि दुसर कोण? दारू बंदी असून आरमोरी तालुक्यात दारू येतेय कुठून? असे विविध प्रश्न ग्रामीण भागातील महिलांना येतोय.