Home रत्नागिरी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून प्रथम येण्याचा मान खेड तालुक्यातील खोपी गावची...

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून प्रथम येण्याचा मान खेड तालुक्यातील खोपी गावची नेहा प्रकाश भोसले हिने पटकावला सर्व स्तरातून होत आहे अभिनंदन

374

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

रत्नागिरी :- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण ८२९ यशस्वी उमेदवारांपैकी महाराष्ट्रातील ९० हून अधिक उमदेवारांनी यश संपादन केले आहे. खेड तालुक्यातील खोपी गावची नेहा प्रकाश भोसले हिने यूपीएससी परीक्षेत यशाचा झेंडा रोवत राज्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष २०१९ च्या नागरी परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. या निकालात पहिल्या १०० उमेदवारांमधे महाराष्ट्रातील ५ उमेदवारांचा समावेश आहे. यात गुणानुक्रमे नेहा भोसले १५ व्या स्थानावर यश प्राप्त केले
यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात महाराष्ट्रातील 12 महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. या मध्ये नेहा भोसले यांना देशभरातील गुणांनुक्रमानुसार १५ वे स्थान मिळाले आहे तर महाराष्ट्रातून त्या पहिल्या ठरल्या आहेत. नेहा भोसले यांच्या नेत्रदीपक यशाबद्दल सातगाव भोसले प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. नेहा हिने प्राप्त केलेले यश हे केवळ खेड तालुक्याची नव्हे तर अवघ्या कोकणाची अभिमानाने मान उंचावली असल्याच्या प्रतिक्रिया तालुक्यातुन व्यक्त होत आहेत

दखल न्यूज भारत

Previous articleदै.पुण्यनगरी’ या लोकप्रिय दैनिकाचे संस्थापक मुरधीलर शिंगोटे यांचे निधन !
Next articleआरमोरी तालुक्याअंतर्गत ग्रामीण भागात बऱ्या पैकी- दारूने केला कहर! उध्वस्त संसारा मध्ये मुख्यतःकारणीभूत ठरतोय दारू! (अल्कोहल) नावाचा जहर! – याला जबाबदार कोण?