अभिनेत्री तसेच अमरावती खा. नवनित राणा कौर कोरोना पाँजिटीव; कुटुंबातील 11 जणांना कोरोना ची लागन

415

 

सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

नागपुर : 6 आँगस्ट 2020
अमरावतीच्या खासदार व चित्रपट अभिनेत्री खा. नवनीव कौर राणा यांच्या सह कुटुंबातील 11जणांना कोरोना ची लागन झाली असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.
4 दिवसांआधी त्यांचे पती (बडनेरा) आमदार रवी राणा यांची 7 वर्षीय मुलगी आणि 4 वर्षीय मुलासह खा. नवनित राणा यांचे सासु सासरे पण पाँजिटीव निघाले होते.
अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची बातमी आहे. त्यांच्या घरातील ११ सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात नवनीत राणा यांच्या दोन्ही मुलांचा आणि सासू-सासऱ्यांचाही समावेश आहे.
खा. नवनित राणा यांना कोरोना ची लागण झाली असत्याची माहिती त्यांनी स्वतः फेसबुक अकाऊंट वरुन आपल्या चाहत्यांना दिली आहे. त्यांत त्यांनी सांगितले की, त्याच्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेता घेता त्यांना पण कोरोना ची लागन झाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी आपापली कोरोना टेस्ट करुन घ्यावी असे त्यांनी आवाहन सुद्धा केले आहे.
४ दिवसांपूर्वी आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांची ७ वर्षीय मुलगी आणि ४ वर्षीय मुलासह कुटुंबातील इतर सदस्यांना कोरोना ची लागन झाली होती. आमदार रवी राणा हे आई -वडिलांना घेऊन नागपूर येथे होते, खा. नवनीत राणा या मुलामुलींची काळजी घेण्यासाठी घरीच होत्या. नवनीत राणा यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांची टेस्ट करण्यात आली होती.रॅपिड अँटिजिन टेस्ट व थ्रोट नमुने घेतल्यानंतर रॅपिड टेस्ट मध्ये खासदार नवनीत राणा यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
खासदारांच्या संपर्कात आलेल्यांची सुद्धा टेस्ट करण्यात येत आहे. सर्वांनी शासननिर्देशांचे पालन करुन दक्षता घ्यावी-सुरक्षित राहावे असे आवाहन खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी सोशल मीडिया तुन केले आहे.