गडगडी – रांगव धरणाचे कालवे बंदिस्त नलिका स्वरूपात करावेत आ. शेखर निकम यांची ना. जयंत पाटील यांच्याकडे मागणी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे दिले आदेश

160

प्रतिनिधी : ओंकार रेळेकर.

चिपळूण : काम पूर्ण झालेल्या संगमेश्वर तालुक्यातील रांगव आणि गडगडी धरणाचे कालवे हे बंदिस्त नलिका पध्दतीने मंजूर करावेत अशी मागणी चिपळूण – संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. यावर तसा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे आदेश ना. पाटील यांनी दिले आहेत. याबाबत भूमिका मांडताना आ. निकम यांनी, कोकणातील माती रवाळ स्वरुपाची असून त्यात होणाऱ्या झाडा झुडपांच्या वाढीमुळे उघडे कालवे लवकर खराब होतात तसेच ते खर्चिक बनतात. यावर उपाय म्हणून बंदिस्त पाईपमधून पाणी नेल्यास ते झिरपण्याचे प्रमाण शून्य होइल, शिवाय आर्थिक किफायतशीर होइल आणि सर्वाना याचा लाभ घेता येइल असे सांगितले. यावर मंत्रीमहोदयांनी हा प्रकार उपयुक्त असून अशा प्रकारचा प्रस्ताव लगेच सादर करा त्याला तात्काळ मंजुरी मिळेल असे आश्वासन दिले आहे.
*दखल न्यूज भारत*