अहेरी येथे श्रीरामाचे पूजन करून भव्य राममंदिर बनविण्याच्या केला संकल्प… श्रीराम सेवा समिती व श्रीराम मंदिर ट्रस्ट ने घेतल पुढाकार

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम: अयोध्या येथे काल शरयू नदीच्या तीरावर रामजन्मभूमीच्या ठिकाणी भव्य राममंदिराचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले, ह्याच शुभमुहूर्तावर अहेरी येथे राममंदिराच्या नियोजित जागेवर प्रभू श्रीराम व बजरंग बली यांचे विधिवत पूजन करून अहेरी येथे भव्य राममंदिर बनविण्याच्या संकल्प श्रीराम मंदिर ट्रस्ट व श्रीराम सेवा समिती अहेरी तर्फे करण्यात आला.
अहेरी राजनगरीत अनेक मंदिरे आहेत परंतु एकही राममंदिर नाही, त्यामुळे अहेरीत एक सुंदर राममंदिर व्हावे अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची राम भक्तांची इच्छा होती, त्यानुसार अहेरी शहरात जागेची निवड करण्यात आली आणि त्या नियोजित जागेवर कालच्या शुभमुहूर्तावर प्रभू श्रीरामाचे पूजन करून अहेरी नगरीत लवकरात लवकर भव्य राममंदिर बनविण्याच्या संकल्प ह्यावेळी करण्यात आला.
यावेळी श्रीराम मंदिर ट्रस्ट व श्रीराम सेवा समिती अहेरीचे पदाधिकारी व विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते तसेच शिवाजीनगर प्रभागातील नागरिक उपस्थित होते.