साकोली वासीयांनी साजरी केली श्रीराम मंदिर भुमीपुजन दिवाळी

116

तालुका प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
दखल भारत न्युज
५ ऑगस्ट
साकोली-श्रीराम मंदिर भुमीपुजन दिवाळी उत्सव ठिकठिकाणी साजरी करण्यात आली.येथील हनुमान मंदिर तलाव वार्ड येथे प्रभु श्रीरामची भव्य रांगोळी काढून सभोवती दिवे लावण्यात आले.सामाजीक कार्यकर्ते चंद्रकांतजी वडीचार यांनी आपल्या कार्यशैलीतुन रांगोळी ची सजावट केली.यावेळी नगरसेवक मनिष कापगते, नगरसेवक हेमंत भारद्वाज,प्रहारचे किशोर बावने सामाजिक कार्यकर्ते शरदजी कापगते भाजपा शहर अध्यक्ष किशोर पोगळे व शहरवासी उपस्थित होते.
नगरसेवक रवीभाऊ परशुरामकर यांनी आपल्या घरी दिवे लावून श्रीराम मंदिर भुमीपुजन उत्सव दिवाळी साजरी केली.
साकोली तालुका भाजपा मिडिया प्रभारी व्यंकटेश येवले, दखल भारत न्युज रायपूर जिल्हा व हिंद सेनेचे राष्ट्रीय प्रतिनिधी भास्कर येवले यांनी सुद्धा दिवे लावून श्रीराम मंदिर भुमीपुजन उत्सव दिवाळी साजरी केली यावेळी भाजपचे सक्रिय कार्यकर्ते गणेश येवले,प्रकाश कोडापे,प्रमोद राऊत, चंद्रशेखर येवले इतर भाजपचे व हिंद सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.