सि. टी. पी. एस. ऊर्जानगर येथील प्रकल्पग्रस्तांना सरळ सेवा भरतीत न्याय द्या :-राजू झोडे प्रकल्पग्रस्तांचे उग्र आंदोलन चिमणी वर चढून आत्महत्या करण्याचा इशारा

222

प्रेम गावंडे
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर

औष्णिक विद्युत केंद्र दुर्गापुर हे आशियातील सर्वात मोठे वीज निर्मिती केंद्र आहे. तीस वर्षापासून या औष्णिक विद्युत केंद्राने शेतकऱ्यांच्या जमिनी नोकरीचे वचन देऊन मिळवल्या. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नोकरी मिळेल या आशेने आपल्या जमिनी विद्युत केंद्राला दिल्या. परंतु तीस वर्ष होऊनही ना कोणता मोबदला ना कोणती नोकरी देण्यात आली. कित्येक वर्ष लोटूनही आणि प्रशासनाच्या पायऱ्या झिजून सुद्धा न्याय मिळाला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांनी आज पर्यंत त्यांना आश्वासनेच दिली पण न्याय मिळवून दिला नाही. दहा -वीस, पंचवीस-तीस एकर जमीन प्रकल्पग्रस्तांनी औष्णिक विद्युत केंद्राला दिल्या परंतु आश्वासना पलीकडे सिटीपीएस ऊर्जाविभाग ने प्रकल्पग्रस्तांना काहीच दिले नाही. कोणत्याही प्रकल्पात जमीन गेल्यावर त्याचा तीन पट मोबदला मिळून नोकरी तात्काळ देण्यात येते परंतु याठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या थंड बस्त्यात गुंडाळून त्यांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. मागच्या सरकारने व आताच्या सरकारने सुद्धा याबाबत दखल घेतली नाही. चंद्रपूर जिल्ह्यातल्या आजी तथा माजी मंत्र्यांनी सुद्धा याकडे पाठ फिरवली होती. यामुळेच आम्हाला न्याय मिळावा म्हणून प्रकल्पग्रस्तांनी कठोर पावले उचलत युनिट आठ आणि नऊ वरील चिमणीवर काल सकाळी सहा वाजता पासून चढून आहेत. सदर प्रकल्पग्रस्तांनी सरळ आत्महत्याचा इशारा दिला जेव्हा पर्यंत नोकरी मिळत नाही तेव्हा पर्यंत आम्ही खाली उतरणार नाही व आत्महत्या करणार असा इशारा दिलेला आहे. या प्रकरणात सरसकट औष्णिक विद्युत केंद्र प्रशासन व ऊर्जामंत्री ,पालकमंत्री जबाबदार आहेत असा आरोप उलगुलान विद्युत कामगार संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केला. प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी शासन व प्रशासनाने तात्काळ त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा काही कमी-जास्त झाल्यास व एखाद्याचा जीव गेल्यास कोणालाही सोडणार नाही व संपूर्ण औष्णिक विद्युत केंद्र बंद पाडू असा इशारा राजु झोडे यांनी दिला.
ऊर्जानगर सिटीपीएस गेट जवळ असंख्य कामगार व प्रकल्पग्रस्त जमा होत तीव्र लढा देत आहेत.औष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी एवढे होऊनही चुकीची भाषा वापरून गैरसमज पसरवत आहेत. प्रकल्पग्रस्तांना न्याय व त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी उलगुलान विद्युत कामगार संघटना तीव्र लढा देऊन वेळ पडल्यास कोणत्याही परिस्थितीला समोर जाण्याचा इशारा राजू झोडे यांनी दिला.