पीक विमा योजनेची मुदत वाढ करावी याकरिता एस डी ओ मार्फत मुख्यमंत्री यांना भाकप चे निवेदन… मुदतवाढ दिली नाही तर तीव्र आंदोलन कॉ विनोद झोडगे यांचा इशारा…

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

ब्रम्हपुरी :- महाराष्ट्र शासनाचे निर्देशानुसार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेची फार्म भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2020 पर्यंत होती. परंतु ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकरी विहित कालावधीत पीक विमा भरू शकले नाही. कारण तालुक्यातील सी एस सी सेंटर मध्ये वारंवार लिंक फेल व सर्व्हर डाऊन राहत असल्यामुळे शेतकऱ्यांना आनलाईन अर्ज सादर करता आले नाही. तसेच सध्याचा कालावधी कोविड -19 संसर्ग असल्यामुळे गर्दीने शेतकऱ्यांना फार्म भरता आले नाहीत. तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत गेल्यामुळे, लाकडाऊन वाढत गेला त्यामुळे आनलाईन फार्म सादर करता आले नाही.

दि 31 जुलै 2020 पर्यंतचा कालावधी हा भात पिकाच्या रोवनिचा ऐन हंगामाचा कालावधी असल्यामुळे शेतकऱ्यांनचे लक्ष भात पीक रोवनिकडे केंद्रित झाले होते. तालुक्यातील विद्युत पुरवठा सतत अनियमित व खंडित राहत असल्यामुळे सी एस सी सेंटरमध्ये शेतकऱ्यांना फार्म भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनचे पीक विमा अर्ज प्रलंबित आहेत. जर त्यांना मुदतवाढ दिली नाही तर त्यांच्यावर अन्याय केल्या सारखे होईल.

आधीच शेतकरी पीडित असून त्यांना अधिक पीळल्या सारखे होईल. म्हणून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे फार्म आनलाईन किंवा ऑफलाईन भरण्याची मुदत 31 आगस्ट 2020 पर्यंत वाढवून देण्याची मागणी भाकप चे राज्य कॉन्सिल सदस्य कॉ विनोद झोडगे यांनी दि 5 आगस्ट 2020 रोजी ब्रम्हपुरी चे उपविभागीय अधिकारी मार्फत मा. मुख्यमंत्री, मा उपमुख्यमंत्री, मा कृषीमंत्री, मा. पालकमंत्री, मा विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. मुदतवाढ दिली गेली नाही तर 10 आगस्ट रोजी एस डी ओ कार्यालय समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कॉ विनोद झोडगे यांनी दिला आहे.