सिर्सी वडधा परिसरात वाघाचा धुमाकूळ, नागरिकामधे भीतीचे वातावरण तर गुराख्यांचा जीव टांगणीला… वनविभागाने ताबडतोब वाघाचा बंदोबस्त करावा गोंडवाना गोटुल समीती तालुकाध्यक्ष विश्वेश्वर दर्रो यांची मागणी…

0
160

 

प्रीतम देवाजी जनबंधू
कार्यकारी संपादक

प्राप्त माहितीनुसार सीर्सी वडधा परिसरात गेल्या तीन ते चार दिवसापासून वाघाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे गुरे चराईसाठी नेणाऱ्या गुराख्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. गेल्या तीन दिवसापासून वाघाचा धुमाकूळ जोरात चालू आहे. वाघाने गायीच्या कळपामध्ये घुसुन गुरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण योगायोगाने वाघाने गुराची शिकार केली नाही परंतु आता दुसऱ्या दिवसापासून वाघांच्या भीतीने गुराखी गायी चराईसाठी जंगलात जाण्यास कचरत आहेत. सोबतच परीसरातील नागरीक पण जंगलात जाण्यास घाबरत आहे. परिसरात एकप्रकारची वाघाची दहशत निर्माण झाली असल्याने सदर गुराख्याचं जीव धोक्यात आले आहे. शिवाय गुराढोरांची शिकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाघाचा धुमाकूळ चालू असल्याने गुराख्यांमधे मध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिर्सी वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सदर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीनं वाघाचा बंदोबस्त करावा व गुराखी यांना जीवित हानी होणार नाही. याची विशेष काळजी घ्यावी अशी गोंडवाना गोटुल समीती तालुकाध्यक्ष विश्वेश्वर दर्रो यांनी मागणी केली आहे. विशेष म्हणजे मागील दोन महिन्यापूर्वी वाघाने एका महिलेला ठार केले होते. सदर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वनविभागाने विशेषत्वाने प्रयत्न करावे. अशी परिसरातील शेतकऱ्यांनी आशा व्यक्त केली आहे.