प्रतिनिधी:रोहन आदेवार
वणी: तालुक्यातील जि. प उच्च प्राथमिक शाळा मारेगाव (को) शाळेत एका वर्षापासुन आॅनलाईन मार्गदर्शन चालु आहे. कोरोना च्या महामारीत शाळा बंद पण शिक्षण सुरु ठेवण्याचे कार्य येथील सर्व शिक्षक आपआपल्या पद्धतीने आॅनलाईन वर्ग घेत आहे. काल नागोरावजी ढेंगळे यांनी वर्ग सहावा व वर्ग सातवा इंग्रजी विषयासाठी झुम वर्गाचे आयोजन केले. ह्या वर्गास प.स.वणी चे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी श्रीमती स्नेहलता आंबटकर व विस्तार अधिकारी श्री नवनाथजी देवतळे हे उपस्थित होते. मॅडमने विद्यार्थ्याशी संवाद साधुन नियमित संपन्न होत असलेल्या वर्गातुन काही अडचणी आहेत का ? शिक्षकवृंदानी सांगीतलेले समजत का? असे अनेक प्रश्न विचारुन संवाद साधले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रोत्साहन दिले. नियमित अभ्यास करा असा संदेश दिला. तर देवतळे साहेबांनी सर्व मुलांना अॅड्राईड उपलब्ध करुन आपल्या मुलावर टाकलेला विश्वास व अभ्यासासाठी पालकांनी केलेल्या प्रयत्ना बद्दल सर्व पालक वर्गाचे अभिनंदन व आभार मानले. वर्गात उपस्थित मुलेही अधिकार्यांशी बिनधास्त पणे बोलले. काही प्रश्न ही मुलांनी विचारले. वारवांर संपन्न होत असलेल्या झुम मिंटीगला अशा पद्धतीने वरिष्ट अधिकारी उपस्थित राहुन मार्गदर्शन करण्याचा हा कदाचित जिल्ह्यात पहिल्यांदाच घडले असुन अशा मान्यवरांच्या उपस्थितीमुळे व मार्गदर्शनामुळे काम करणार्या शिक्षकांत व विद्यार्थ्यांना आनंद होतो उत्साह वाढतो.
आता यापुढे विषयतज्ञ म्हणुन काम करणारे बी आर सी चे साधनव्यक्ती ,व जिल्ह्यातील/प.स.मधील विषय तज्ञ शिक्षक यांनाही पाचारण करुन वर्गात विविधता आणुन वर्ग कसे रजंक करता येईल वेगवेगळ्या पद्धतीने विषयाची सखोल माहीती मुलांना कसे देता येईल. याचे आता नियोजन करण्यात येत आहे. आॅन लाईन उपस्थित राहुन मार्गदर्शन केलेल्या मान्यवरांचे आभार मानले. अशी माहिती मुख्याध्यापक अरविंद गांगुलवार यांनी कळविले आहे .