पिडीतांच्या न्याय हक्कासाठी वणी पोलीसांच्या विरोधात,उद्या एक दिवसीय धरणे आंदोलन,शास्त्री नगर मधिल ३ अल्पवयीन मुली पळवुन नेल्याचे प्रकरण

458

 

यवतमाळ/ परशुराम पोटे

जिल्ह्यातील वणी शहरात दि.११ जुलै रोजी शास्त्री नगर परिसरातील ३ अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्या होत्या. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.यानंतर त्या बेपत्ता मुलींच्या पालकांनी रात्री ८ वाजताचे दरम्यान वणी पोलीस ठाणे गाठुन मुली बेपत्ता झाल्याची माहिती दिली.प्रकरण गंभिर असल्याचे लक्षात येताच वणी पोलीसांनी तात्काळ सुत्रे हलवुन मुली पळवुन नेणार्या त्याच भागातील एेहतेशाम नामक ईसमाचा शोध लावुन त्याला ताब्यात घेऊन काही वेळातच त्या बेपत्ता मुलींचा शोध लावला. त्या तिनही मुली शहरातीलच पंचशिल नगर मध्ये एका किरायाच्या घरात सापडल्या. पोलीसांनी घर मालकीन असलेल्या दोन भगिनींना व त्या तिन मुलींना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आनले.चौकशी दरम्यान घरमालक असलेल्या दोन्ही भगिनींना पोलीसांनी शिवीगाळ करुन मारहान केली.व मध्य रात्री त्या दोन्ही भगीनींना सोडुन दिले.विशेष म्हणजे मुली पळवुन नेणार्या ईसमालाही पोलीसांनी सोडुन दिले.या गंभीर घटनेची दखल येथिल सामाजीक कार्यकर्त्यांनी घेतली व पिडीतांच्या न्याय हक्कासाठी व फुस लावुन मुली पळवुन नेणार्या एेहतेशामवर गुन्हे दाखल करण्यासाठी पिडीत मुलींना घेवुन थेट यवतमाळ गाठुन जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले. या निवेदनाची दखल घेत एसपिंनी वणी पोलीसांना गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले.त्यानुसार तब्बल १६ दिवसांनी का होईना मुली पळवुन नेणार्या शास्त्री नगर येथिल एेहतेशामवर वणी पोलीसांनी गुन्हे दाखल केले.परंतु प्रकरण गंभिर असुनही आरोपीवर गंभिर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. परिणामी तो आरोपी तात्काळ जामिनवर मोकळा झाला.यामुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधान आले होते. तसेच त्या दोन भगिनींना मारहान करुन मध्यरात्री पायदळ घरी पाठविणार्या पोलीसांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.या गंभिर प्रकरणातील अल्पवयीन मुलींना फुस लाऊन पळवुन नेणारा आरोपी एेहतेशाम वर पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल करावे, या प्रकरणात आरोपीला अभय देणार्या व त्या दोन भगिनींना मारहान करुन मध्यरात्री पायदळ घरी पाठविणार्या पोलीसांवर गुन्हा दाखल करुन चौकशी दरम्यान निलंबीत करावे,या प्रकरणाच्या चौकशीसाठी वेगळा अधिकारी नियुक्त करावा, दोषी पोलीस अधिकार्यांवर अनुसुचीत जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा,व या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी या मागण्या घेऊन उद्या दि.७ आँगष्ट्ला शुक्रवारी सकाळी ११ वाजता तहसिल कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन अनिल तेलंग,काँ.अनिल घाटे,प्रविण खानझोडे,आसिम हुसेन,रफिक शेख,अँड.रुपेश ठाकरे,शाबाद अहमद,राकेश खामनकर,गौरव जवादे,क्रुपाशील तेलंग,प्रलय तेलतुंबडे यांनी केले.