पारशिवनी येथे कोविड योद्धा गौरव व सलून सुरक्षा कीट वितरण

157

 

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

प्रतिनिधी: आकाशझेप फाऊंडेशन द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान व पंचायत समिती पारशिवनी यांचे संयुक्त विद्यमाने दि.४ ऑगस्टला कोरोनाच्या जागतिक संकटात जनसामान्यांच्या संरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कार्य करणारे तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स व सामाजिक कार्यकर्त्यांचा कोविड योद्धा गौरव व नाभिक समाजातील सलून व्यावसायिकांना सुरक्षा कीट वितरण कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाध्यक्ष व गटविकास अधिकारी प्रदीप बमनोटे, प्रमुख पाहुणे सभापती मीनाताई कावळे, उपसभापती चेतन देशमुख, नगराध्यक्षा प्रतिमाताई कुंभलकर व टीएचओ. डॉ. प्रशांत वाघ, पत्रकार गोपाल कडू, आकाशझेपचे प्रा.अरविंद दुनेदार, राजू बर्वे, साक्षोधन कडबे, प्रा.सुनिल वरठी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी तहसीलदार वरूण कुमार सहारे, बीडीओ प्रदीप बमनोटे, पोलीस निरीक्षक विलास चव्हाण, सीओ अर्चना वंजारी, डॉ. प्रशांत वाघ टीएचओ, डॉ. गजानन धूर्वे, डॉ. तेजराम भलावी, डॉ. जयचंद कोचर, डॉ. निशांत गायकवाड, डॉ. तारिक अंसारी, डॉ. वैशाली हिंगे, डॉ. योगेश चौधरी, डॉ. दिप्ती पुसदेकर, डॉ. रवी शेंडे, डॉ. तुषार धुंडे, डॉ. स्वप्नील वैरागडे, सामाजिक कार्यकर्ता गजानन चौधरी(म.रा.प. मं.), रूपेश खंडारे (दैनिक सकाळ), अमोल कनोजे, रणजित ठाकूर, गौरव पनवेलकर, परसोडी पेठ येथील मोरेश्वर दरवई, प्रशांत तुरणकर, अभय चकबैस यांना गौरविण्यात आले तसेच पत्रकार गोपाल कडू यांचे सौजन्याने शेषराव येऊतकर, रविंद्र फुलबांधे, दत्तु येऊतकर, जगदीश फुलबांधे, योगेश कडू, सचिन थूल, विकास उनपाने, लोकचंद सूर्यवंशी, देविदास चौधरी, अतुल राजूरकर, दिपक वलुकर, राहुल कावळे, महेंद्र कळसकर, नरेंद्र उनपाने, रत्नाकर फुलबांधे, दिलीप उनपाने, सुभाष उनपाने, शंकर उनपाने, लिलाधर कावळे, विलास उनपाने यांना सलून सुरक्षा कीट वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.अरविंद दुनेदार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. ताराचंद चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ एकता मंच यांचे सहकार्य लाभले.