Home महाराष्ट्र भदंत सद्धम्मात्तित सदानंद महाथेरो यांना शासकीय मानवंदना ने दिला अंतिम निरोप

भदंत सद्धम्मात्तित सदानंद महाथेरो यांना शासकीय मानवंदना ने दिला अंतिम निरोप

457

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

नागपुर / वर्धा: ६ आँगस्ट २०२०
आंतरराष्ट्रीय भिख्खू संघाचे उपाध्यक्ष तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व संघानूशासक सदानंदजी महास्थविर यांचे परवा दि. ४ आँगस्ट २०२० रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी नागपूर च्या संघर्ष नगरातील संघाराम बुद्ध विहारात दुःखद निधन झाले होते.
भदंत सद्धम्मात्तित सदानंद महाथेरो हे मुळचे भंडारा जिल्ह्य़ातील पवनी तालुक्यातील वीटगाव येथील मुळ रहिवासी होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील केळझर या गावातील ऐतिहासिक धम्मरजीक बुद्ध विहार उभारले. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर बौद्ध धम्म प्रचार व प्रसारात ते आघाडीवर होते. त्यांनी आतापर्यंत अनेक पुस्तके लिहिली असुन अनेक पुस्तकांचे भाषांतर ही केले आहे.
काल दुपारी २ वाजता च्या सुमारास नागपूर च्या संघर्ष नगरातील संघाराम बुद्ध विहारात बौद्ध उपासक उपासिकांनी तसेच शासकीय पातळीवर भदंत सदानंदजी महास्थविर यांना साश्रुनयनाने समता सैनिक दलाच्या वतीने व भिख्खु संघाच्या प्रमुख उपस्थितीत मानवंदना व आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नागपुर चे जिल्हाधिकारी डॉ. रवींद्र ठाकरे, तसेच सहायक पोलीस आयुक्त, राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सदस्या अँड. सुलेखाताई कुंभारे, समता समाज संघाचे अध्यक्ष सेवानिवृत्त अधिकारी किशोरजी गजभिये, यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली अर्पण केली. त्यानंतर उपस्थित शेकडो उपासक-उपासिका यांनी भदंत सद्धम्मात्तित सदानंद महाथेरो यांचे पार्थिव शरीर एका तिरंगी ध्वजांत लपेटून एका ओपन वाहनावर महापरीनिर्वान यात्रा केळझर (वर्धा) कडे रवाना झाली.

*बंदुकीच्या ३ फैरी झाडुन जिल्हा प्रशासनाने दिली भदंत सदानंद महास्थविर यांना मानवंदना*

भदंत सद्धम्मात्तित सदानंद महाथेरो यांचे पार्थिव शरीर वर्धा जिल्ह्य़ातील सेलु तालुक्यात असलेल्या केळझर येथील ऐतिहासिक धम्मरजीक बुद्ध विहार येथे महापरीनिर्वान यात्रा पोहोचली. तिथे वर्धा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी शासकीय मानवंदना व पुष्पचक्र भदंत सदानंद महाथेरो यांचे पार्थिव शरिरास अर्पण केले. त्यानंतर वर्धा शहर पोलिसांनी बंदुकीच्या ३ फैरी झाडुन त्यांना मानवंदना अर्पण केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप व अचलित कांबळे यांनी पुष्पचक्र वाहिले.
त्यानंतर भदंत धम्मसेवक महाथेरो डॉ. एम. सत्यपाल करुणानंदन ज्ञानरक्षक यांनी भदंत सदानंद महाथेरो यांच्या चितेला मुखाग्नी दिला. त्याआधी नागपूर हुन भदंत सदानंद महाथेरो यांचे पार्थिव शरिरास लपेटलेला तिरंगा ध्वज भारतीय बुद्ध सेवा संघाचे सचिव पी. एन. खोब्रागडे यांना सुपूर्द करण्यात आला.
यावेळी तहसीलदार सोनवणे, भंते सत्यशील धम्मसेवक महाथेरो, डॉ. उपगुप्त महाथेरो, डॉ. के. एम. महाथेरो आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
भदंत सद्धम्मात्तित सदानंद महाथेरो यांना अंतिम बिदाई(निरोप) देण्यासाठी निसर्ग ही पावसाच्या रुपात आपले नयनाश्रु गाळत होता.

Previous articleउप पोलिस स्टेशन राजाराम(खां) च्या वतीने 150 शेवगा रोपांचे वाटप….
Next articleपारशिवनी येथे कोविड योद्धा गौरव व सलून सुरक्षा कीट वितरण