उप पोलिस स्टेशन राजाराम(खां) च्या वतीने 150 शेवगा रोपांचे वाटप….

164

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम : अहेरी उपविभागातील उप पोलिस स्टेशन राजाराम
खां.च्या वतीने राजाराम येथील निवडक शेतकऱ्यांना 150 शेवगा या औषधी गुण वनस्पती रोपांची वाटप करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमामध्ये कोविड -19 नियम लक्षात घेऊन सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन करुन शेतकऱ्यांना उप पोलिस स्टेशन ला बोलावून त्यांना शेवग्याचे आहारातील महत्त्व पटवून दिलेतसेच शेवगा लागवड कशी करावी तसेच शेवग्याचे आर्थिकदृष्ट्या किती महत्व आहे आणि आरोग्य दृष्ट्या महत्त्व याची माहिती देण्यात आली. व उप पोलिस स्टेशन ला देखील 15 झाडांची लावणं करून शेतकऱ्यांना शेवगा लागवडीचे प्रत्यक्षिक दाखविण्यात आले.
सदर कार्यक्रमाला उप पोलिस स्टेशन राजाराम खांदला चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद भोरे साहेब, उपनिरीक्षक श्री अमोलजी खटावकर साहेब, उपनिरीक्षक श्री कोल्हे साहेब, उपनिरीक्षक श्री कड साहेब तसेच पोलीस स्टेशन चे कर्मचारी व राजाराम गावातील नागरिक उपस्थित होते.