प्रेमाने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना अर्थसहाय्य म्हणून जि. प.अध्यक्ष यांचे हस्ते धनादेश वाटप

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

गडचिरोली दि 6 ऑगस्ट-
शासन निर्णय दिनांक 12 जानेवारी 1996 अन्वये जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आंतरजातीय विवाहित जोडप्यांना अर्थसहाय्य देणे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे
शासन निर्णय क्रमांक दिनांक 1 फेब्रुवारी 2010 अन्वये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यापैकी एक व्यक्ती आणि सवर्ण, हिंदु, जैन, लिंगायत , शीख यापैकी दुसरी व्यक्ती अशांनी विवाह केल्यास तसेच मागासवर्गातील अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती- जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विवाहित जोडप्यांना या योजनेअंतर्गत रुपये पन्नास हजार अर्थसहाय्य देण्यात येते. सदर धनादेश पती-पत्नीच्या संयुक्त नावाने प्रदान करण्यात येते. जानेवारी 2010 पर्यंत रुपये 15000 देण्यात येत होते.
सध्या स्थितीत जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली कार्यालय 245 प्रस्ताव प्राप्त असून त्यापैकी 160 प्रस्ताव प्राप्त निधी नुसार रू. 79.65 लक्ष खर्च करण्यात आले आहे. सदर 160 विवाहित जोडप्यांना आज दिनांक 5/8/ 2020 रोजी धनादेश वितरित करण्यासाठी बोलावण्यात आले होते .
धनादेश वाटप करतानाचे कार्यक्रमाचे
अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, प्रमुख अतिथी मनोहर पाटील कोरेटी उपाध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली,
फरेन्‍द्र कुलारकर अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी,
रविनाताई कोडापे सभापती समाजकल्याण समिती, रमेश बारसागडे सभापती कृषि व पशुसंवर्धन समिती, गीता ताई कुमरे सदस्य जिल्हा परिषद गडचिरोली , लता पुंगाटी सदस्य जिल्हा परिषद गडचिरोली, अनिल केरमी सदस्य जिल्हा परिषद गडचिरोली, माणिक चव्हाण समाज कल्याण अधिकारी
या कार्यक्रमाचे संचालन रतन शेंडे विस्तार अधिकरी पंचायत,प्रास्तविक माणिक चव्हाण समाज कल्याण अधिकारी तर आभार अमोल श्रीमरवर समाज कल्याण निरीक्षक तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश मोरे, राजेश्वर दराडे, प्रमोद ढगे, भास्कर दोनाडकर, पसारकर, महेश नाईक यांनी कार्य केले.