लहान कोरोना बाधित मुलांनसाठी देवदूत ठरलेले शासकीयरुग्णालयात उपचार घेणारे डॉक्टर दिलीप मोरे यांचे दुःखद निधन

0
411

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

रत्नागिरी : वैद्यकीय क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे व कोरोनाच्या काळात लहान मुलांसाठी देवदूत ठरलेले सगळ्यांचे आवडते डॉक्टर व खऱ्या अर्थाने एखादया योद्धया प्रमाणे कोरोना काय पण इतर वेळा ही डॉक्टरी पेशा मध्ये ही काम करणारे बाल रोग तज्ञ डॉक्टर दिलीप मोरे यांचे आज पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
रत्नागिरी शहरात लहान मुलांचे डॉक्टर पण गरीब लोकांनसाठी देवदूत असणारे डॉक्टर आज कोरोना चे बळी गेले आहेत.
शासकीय नियमानुसार निवृत्ती होऊन ही केवळ लहान मुलाच्या प्रेमा पोटी आवडीने काम करणारे डॉक्टर आता राहिले नाहीत नुकतेच त्यांनी 42लहान मुलांना कोरोना पासून वाचवले होते तेच डॉक्टर आज त्याचा शिकार झाले आहेत. कोरोना काळात लहान मुलांसाठी ते देवदूत ठरले आज त्यांच्या मृत्यूने अनेकांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. निवृत्तीनंतर देखील वैद्यकीय क्षेत्रात काम करून रुग्ण सेवा करण्याचे व्रतच जणू त्यांनी घेतले होते. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.

दखल न्यूज भारत