११३बटालियन धानोरा च्या वतीने राबविले आत्मनिर्भर अभियान

 

धानोरा/भाविकदास करमनकर

धानोरा येथील ११३ बटालियन च्या वतीने सिविक्स ऍक्शन प्रोग्राम च्या अंतर्गत कोरोना संक्रमणाच्या काळात 113 बटालियन सीआरपीएफ चे श्री जी डि पंढरिनाथ यांच्या नेतृत्वाखाली धानोरा तिल ग्रामीण लोकांसाठी युवकांसाठि व महिलांसाठी प्रशीक्षण योजना राबविण्यात आली होती यामध्ये महिलांसाठी शिवण क्लास युवकांसाठी रोजगार म्हणून मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण व मेसन मिस्त्री चे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले होते यामध्ये प्रत्येकी 20 महिलांना व युवकांना याद्वारे प्रशिक्षण देऊन एकुण ६० परिवारांना आत्मनिर्भर करून त्यांना स्वावलंबी करण्याचे कार्य 113 बटालियन च्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले याप्रसंगी कमांडंट जि डि पंढरीनाथ यांनी युवकांना आत्मनिर्भर बनावे असे मार्गदर्शन केले याप्रसंगी उप कमांडर प्रमोद शिरसाट व धानोरा येथील नगरपंचायत अध्यक्षा लीनाताई साळवे तसेच जिल्हा महिला आघाडिच्या अध्यक्षा ताराबाई कोटांगले उपस्थित होत्या