अनोख्या पद्धतीने वारजे परिसरात भाजप महिला पदाधिकार्यांनी रक्षाबंधन साजरे केले.

96

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी , पुणे शहर यांच्यावतीने अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
कोरोना,कोवीड १९ या महामारीने संपुर्ण जगाला वेठीस धरले आहे . या काळात शासनाने घालुन दिलेले नियम पालन तुम्हा आम्हा जनतेकडून करून घेण्यासाठी ज्यांनी आपले कुटुंब , आपला सगळा वेळ आणि वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालुन आपले कर्तव्य बजावले , अश्या सन्माननीय पोलीस अधिकारी , कर्मचारी ,पुणे महानगरपालिका आरोग्य निरीक्षक , मुकादम ,डाॅक्टर व अन्य सेवाभावी संस्थांचे सदस्य यांना रक्षाबंधनाचे निमित्ताने भाजपच्या महिला पदाधिकारी यांनी राखी बांधुन त्यांचे बद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच त्यांचा यथोचित सन्मान केला .
असे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविणारे स्वीकृत सभासद सचिन दांगट यांचे नेतृत्वाखाली वारजे माळवाडी परिसरातील हा उपक्रम यशस्वी झाला . सदर कार्यक्रमास भारतीय मजदुर संघाचे प्रकाशजी आळंदकर , वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मा.मच्छिंद्र पंडीत सो यांचेसह स्टेशनचे कर्मचारी , वारजे वाहतुक विभागाचे पोलीस निरीक्षक मा.किरण लोंढे सो यांचेसह वाहतुक कर्मचारी , पुणे महानगरपालिका आरोग्य निरीक्षक ऋतुराज दिक्षीत , सचिन सावंत , मुकादम संतोष बराटे यांचेसह रेणुका मोरे , वर्षा पवार , रेश्मा दोशी , सुप्रिया निंबाळकर , अमजद अन्सारी , किरण साबळे आदि पदाधिकारी उपस्थित होते .