कांद्री येथे १ लाख ७१ हजाराची घरफोडी करणारा आरोपी अटक गुन्हे शाखा नागपुर, कन्हान गुन्हे पथक पोलीसची कारवाई.

163

 

कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान : – सुखदेवे कॉलोनी कांद्री येथील सौ ममता रविदास यांच्या घरातील सोन्याचांदीचे दागिणे व नगदी वीस हजार असा एकुण एक लाख ७१ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरी करण्या-या आरोपीस गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर, कन्हान गुन्हे पथक व कन्हान पोलीसानी सयुक्त कारवाई करून आरोपीस अटक केले.
बुधवार (दि.२१) ला रात्री सौ ममता मोहन रविदास वय २८ वर्ष रा सुखदेवे कॉलेनी कांद्री यांच्या घराचे दाराचे कुलुप व बेडरूमच्या लोंखडी कपाटाचे कुलुप तोडुन सोन्या चांदीचे व नगदी २००००रू असा एकुण १७१००० रू (एक लाख ऐ कात्तर हजार) चा मुद्देमाल आणि पतीचे कागदपत्र चोरी करणारा आरोपी शुभम महेंद्र चव्हाण रा श्यामनगर पारडी नागपुर यास मंगलवार(दि.४) ला पोलीसांनी ताब्यात घेत त्याच्या कडुन अदाजे २५ग्राम सोने चे दागिने, किंमत एक लाख रू चांदीचे ४००ग्राम दागिने किंमत १५ हजार रू व गुन्हयात वापरलेली बजाज कम्पनीची मोटार सायकल क्र एम एच ३१ डी टी ९६०८ अदाजे किंमत ४० हजार रू असा एकुण १ लाख ५५ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई कन्हान गुन्हे पथक पो ह येशु जोसेफ, पो शि मुकेश वाघाडे, संजय बरोदिया, सुधिर चव्हाण, स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर (ग्रा) चे पोलिस निरिक्षक अनिल जिट्टावार याचे मार्गदर्शनात उप निरिक्षक दुबेI,निलेश बर्वे,शेलेश यादव, विरेन्द्र नरड, प्रणय बनाफर , सो ठेबराव वडाळे, हयानी आरोपीचा कॅमरे चे सहायने शोध घेऊन घरफोडीतील १ लाख १५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक करून भा द वी ची कलम ३८०,४५७ ने दाखल करून पुढील तपास पोलीस अधिक्षक राकेश ओला, गुन्हे शाखे पुलिस निरिक्षक अनिल जिट्टावार,उप विविभागीय पोलिस आधिकारी संजय पुजलवार, कन्हान थानेदार अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्श नात पोलिसउपनिरिक्षक जाविद शेख हे करित आहे.