श्रीराम मंदिराच्या भूमि पुजनाचा आनंदोत्सव वडगाव बुद्रूक येथे प्रतिमेचे पुजन व पेढे वाटून साजरा करण्यात आला, नगरसेवक हरिदास चरवड.

96

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्री रामाच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा, पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते आज बुधवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी संपन्न होत असल्याच्यामुळे देशात सर्वत्र उत्साहाचे आणि आनंददाचे वातावरण आहे. या आनंदउत्सवाच्या पाश्वभूमीवर नगरसेवक हरिदास चरवड यांच्या माध्यमातून वडगाव बुद्रुक मुख्य चौकात श्रीराम प्रतिमेचे पूजन, जय श्री रामाच्या जय घोषात , पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी रा .स्व. संघाचे जितेंद्र चंपानेरकर, बजरंग दांगट,बंडू जाधव ,सुभाष टेंबेकर,लेले काका, डॉ.विवेक काळे, श्रीराम अभ्यंकर, गिशिष काशीद, प्रकाश दांगट,चंद्रकांत पवळे,आनंद भोईर,प्रकाश चरवड,अशोक मोदी,संग्राम पवार,विनोद डागा आदि मान्यवर उपस्थित होते.