कृषिदूतांनी सादर केले शेततळ्याचे प्रात्यक्षिक

108

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

अकोट तालुक्याती लोहारी व चिंचखेड
येथे स्वा.विर गणपतराव इंगळे कृषि महाविद्यालय जळगाव जामोद येथील कृषिदूतांनी ‛ग्रामीण कृषि कार्यानुभव’ कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना शेततळ्याबद्दल अधिक माहिती दिली. कृषिदूत गौरव प्रदीप ठाकरे,अखिल अनिल उबाळे यांनी शेतकऱ्यांना शेततळ्याचा आकार किती असावा,पाण्याचे नियोजन कसे करावे,त्याची स्वछता कशी ठेवावी इ बाबींबद्दल मार्गदर्शन केले.प्रसंगी कृषिदूतांनी शेततळ्याचे फायदे कृषि विभागाकडून मिळणारे अनुदान याविषयी माहिती दिली.यावेळी शेतकरी नंदकुमार ठाकरे,पंकज गावंडे,प्रमोद बोदळे, दीप ठाकरे ,आदि उपस्थित होते.या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषिदूतांना कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई , कार्यक्रम अधिकारी प्रा. अविनाश आटोळे , समुपदेशक प्राध्यापिका विद्या कपले मॅडम
तसेच विषय विशेषज्ञ प्रा.अमोल चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले.