घुग्घुस येथिल हनुमान मंदिरात राम जन्मभूमि भूमिपूजन उत्सव पूजाअर्चना करुन साजरा

213

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
विश्व हिंदू परिषद प्रेरित बजरंग दल घुग्घुस शाखे तर्फे राम जन्मभूमिवर राममंदिरा चे
भूमिपूजन सोहळा साजरा करण्यात आला त्या प्रीत्यर्थ घुग्घुस येथील शास्त्रीनगर रोड वरील हनुमान मंदिर येथे पूजा अर्चना करण्यात आली तसेच बजरंग दल च्या कार्यालयात वृक्षरोपन करण्यात आले. सर्व राम भक्तांनी जय श्री राम च्या जयघोषात मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पड़ला.
या कार्यक्रमात प्रामुख्याने ग्राम पंचायत सदस्य व उत्तर भारतीय मोर्चा प्रदेश सचिव संजय तिवारी ,बजरंग दल घुग्घुस चे नेता राजेश चौधरी ,शैलेश गिरी, सोनल भरटकर, विजय कपूर सिंह, मलेश बल्ला, अनिल गुप्ता, अभिषेक सिंह, दिनेश बोरपे व शेकडो बजरंग दल कार्यकर्ता उपस्थित होते.