पत्रकार शैलेश जाधव यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान

169

 

प्रतिनिधी / ओंकार रेळेकर.

चिपळूण : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्यावतीने पत्रकार शैलेश जाधव यांना नुकतेच कोविड योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले.
कोरोना संकट काळात डाँक्टर, आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी, पोलीस, पत्रकार हे सर्व कोरोना योध्दे आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावत आहेत. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रदेश महिला मोर्चाच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रभर कोरोना योध्दयांचा सन्मान करण्यात आला. पत्रकार शैलेश जाधव यांना गौरवपत्र देऊन कोविड योध्दा म्हणून गौरविण्यात आले. यावेळी महिला चिपळूण तालुकाध्यक्षा प्रतिज्ञाताई कांबळी, नगरसेविका नुपूर बाचिम, भाजपा उपतालुकाध्यक्ष संदिप सुखदरे, माजी नगरसेवक संतोष टाकळे आदि उपस्थित होते.

दखल न्यूज भारत