अयोद्धेसोबतच रामटेकमध्येही जल्लोष सुरु

पूजा उईके रामटेक तालुका प्रतिनिधी

रामटेक: आज 5 ऑगस्ट ला रामजन्मभूमी अयोद्धेत बहुप्रतिष्टित राममंदिर निर्माणाचे भूमिपूजन प्रांतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होताच रामनगरी रामटेकलाही जल्लोष हर्षोलाभ करण्यात आला. रामभक्तांनी एकदुसऱ्यांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केले. गांधीचौक हे पूर्ण भगवा तोरणाने सजविलेले होते. रामटेक शहरात आज सकाळपासूनच उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसून येत होते. जय श्री राम आणि भारत माता कि जय चा घोषणा मिठाई वाटून आणि फटाके फोडून हर्षोलाभ करण्यात आला. गडमंदिर पहाडीवर राममंदिरात आज आरती करण्यात आली. आणि सर्वजण गांधीचौकपर्यंत रॅलीने आले. माजी आमदार दि. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी सर्वांचे तोंड गोड केले. प्रत्येक रामभक्त एकमेकांना शुभेच्छा देत होते. उत्साहावर मात्र कोरोनाचा प्रभाव स्पष्ट दिसून आला. रामटेक मधील ठाणेदार यांनी कोरोना परिस्थिती लक्षात घेत गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत होते.