कर्तव्यावर असतांना मृत्यु झालेल्या आरोग्य सेविकेच्या कुटुंबातील एका सदस्याला नौकरीत सामावून घ्या आमदार किशोर जोरगेवार यांचे निर्देश, तात्काळ २५ हजार रुपयांची आर्थिक मदत.

178

 

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
कंत्राटी पध्दतीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असलेल्या संगीता पाटील यांचा कर्तव्यावर असतांनाच मृत झाल्याची घटना काल मंगळवारी घडली. उपचाराअभावी सदर महिला कर्मचा-याच्या मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान आज बुधवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी रुग्णालयाला भेट देत सदर घटणेची माहिती घेतली असून मृत महिला कर्मचा-याच्या कुटुंबातील एका सदस्याला तात्काळ नौकरी देण्याचे निर्देश दिले आहे. तसेच मृत महिलेला तात्काळ २५ हजारांची तात्काळ आर्थिक मदत दिली आहे. यावेळी जनविकास सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक पप्पू देशमूख, कामगार युनियनचे अॅड. शैलेश मुंजे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुरपाम, निवासी वैद्यकीय अधिकारी भास्कर सोनारकर, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, डॉ. अनंत हजारे आदिंची उपस्थिती होती.

जिल्हा सामन्य रुग्णालयात कंत्राटी पध्दतीवर काम करणा-या कर्मचा-यांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहे. मात्र ते सोडविण्याच्या दिशेने आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न सुरु आहे. या संदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमूख यांच्याशी आमदार किशोर जोरगेवार यांचा सतत पाठपूरावा सुरु आहे. दरम्यान येथेच कर्तव्यावर असतांना महिला कर्मचाऱ्याला हृद्यय विकाराचा झटका आल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उचाराकरीता दाखल करण्यात आले. उपचारा दरम्याण तिचा मृत्यू झाला. मात्र योग्य उपचार न मिळाल्याने तिचा मृत्