सिएसटीपीएस येथील प्रगल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत आमदार किशोर जोरगेवार यांची ऊर्जामंत्री यांच्याशी चर्चा आंदोलन मागे घेण्याचे आवाहण, आंदोलनस्थळी भेट, उच्च स्तरीय बैठक लावण्याचे ऊर्जामंत्री यांचे निर्देश

153

 

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
जमीनीचे अधिग्रहण करुन सुध्दा प्रकल्पग्रस्तांना चंद्रपूर महाऔष्णिक विद्यूत केंद्रात रोजगार न मिळाल्याने संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी आज सिएसटीपीएसच्या चिमनीवर चढून आंदोलन सुरु केले. याची माहिती होताच आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत ऊर्जामंत्री नितीन राऊत, राज्य ऊर्जामंत्री प्राजक्त तनपूरे व चंद्रपूर महाऔष्णिक विद्यूत केंद्राच्या संचालिका शैला ए यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधत प्रकल्पग्रंस्तांच्या आंदोलनाबाबत माहिती दिली. तसेच यावेळी सदर आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. यावेळी या संदर्भात सोमवारी उच्च स्तरीय बैठक लावण्याचे निर्देश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे. तोवर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेण्याचे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.
सिएसटीपीएस च्या माध्यमातून विद्यूत निर्मीती केल्या जात आहे. हा प्रकल्प सुरु करत असतांना अनेक शेतक-यांच्या शेतजमीनी प्रशासनाच्या वतीने हस्तांतरित केल्या गेल्या. या मोबदल्यात नौकरी व आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या प्रक्रियेत विलंब होत आहे. त्यामूळे संतप्त झालेल्या ९ प्रकल्पग्रस्तांनी आज बुधवारी सिएसटिपीएसच्या चिमनीवर चढून आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोनस्थळ गाठत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत, राज्य ऊर्जामंत्री प्राजक्त तनपूरे व चंद्रपूर महाऔष्णिक विद्यूत केंद्राच्या संचालिका शैला ए यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधत सदर आंदोलनाची माहिती दिली. तसेच या प्रकल्पग्रस्तांच्या न्यायक मागण्यांबाबत अवगत केले. सदर प्रकल्पग्रस्त हे मागील अनेक वर्षांपासुन आपल्या मागण्यांसाठी लढत आहे. मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामूळे प्रकल्पग्रस्तांमध्ये रोष असणे स्वाभाविक आहे. मात्र महाविकास आघाडीचा सदस्य म्हणून या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रकल्पग्रस्तांना दिले. तसेच या संदर्भात तोडगा काढण्यासाठी बैठक लावण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना केली. मागणीची तात्काळ दखल घेत ना. नितीन राऊत यांनी सोमवारी या संदर्भात मुबंई येथे उच्च स्तरिय बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांचीही उपस्थिती राहणार आहे. तोवर आंदोलकर्त्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहण आ. किशोर जोरगेवार यांनी केले.
..…………….……………………..…..