तिरोडा शहरात उद्यापासून तीन दिवसाचा कर्फ्यू

126

 

प्रतिनिधी
बिंबिसार शाहारे / राहुल उके

तिरोडा,दि.05ः-शहरासह तालुक्यात सातत्याने वाढत असलेले कोरोना रुग्णसंख्यावर आळा घालण्यासाठी तसेच संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तिरोडा शहरात उद्या गुरुवारपासून खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ३ दिवस (दि. ०६ ते ०८ ऑगस्ट २०२० पर्यंत ) जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन नगर परिषदेचे वतीने करण्यात आले आहे.जनता कर्फ्यू संदर्भात आमदार विजय रहागंडाले,उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपडे,नगराध्यक्ष सोनाली देशपांडे,उपाध्यक्ष सुनिल पालांदूरकर, मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांच्या उपस्थितीत मंगळवारला आढावा घेण्यात आला.त्यानंतर गुरुवारपासून तीन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरविण्यात आले.