Home कोरोना  कोविड १९ ची भीती ओसरली की व्यवस्था कोलमडल्यात जिल्ह्यात कोविड रुग्णवाहिका वाढविण्याची...

कोविड १९ ची भीती ओसरली की व्यवस्था कोलमडल्यात जिल्ह्यात कोविड रुग्णवाहिका वाढविण्याची मागणी जिल्हा कोविड १९ आपत्ती व्यस्थापन यांचे पुढाकाराची गरज

143

 

अतित डोंगरे दखल न्यूज प्रतिनिधी तिरोडा.

तिरोडा : अदानी वीज कारखान्यातील २१ कामगार कोविड १९ ने बाधीत असल्याचा खुलासा ३१ जुलै रोजी प्राप्त झाला. यापैकी मुंडीकोटा येथील अदानी कामगारांच्या संपर्कात आलेल्या इसमांचे नमुने घेण्यात आले. या खेरीज अन्य तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता गेलेल्या महिलेचा कोविड बाधीत रुग्णाच्या समपर्कात आल्याचा कळाल्यावरून यांचे सँपेल घेतले. त्यांचे कोविड बाधीत असल्याचा वैद्यकीय परिक्षणा अंती कळाले.
उल्लेखनीय असे की, मुंडीकोटा येथील कोरोना बाधीत रुग्ण वाहकाच्या समपर्कात आलेल्या इसमांचे अहवाल कोविड १९ बाधीत आल्याचे कळताच त्यांना पुढील उपचाराकरिता हलविण्यात आले. पण त्याचे संपमार्कांत आलेल्या त्या इसमांचे व महिलेच्या संमपर्कात आलेल्या इसमांना अद्याप आरोग्याच्या पुढील तपासणी करिता नेण्यात आले नसल्याने कोविड १९ ची भीती ओसरली की आरोग्य आणि महसूल व्यस्था कोलमडली. असा सवाल येथील जनमानसात व्यक केला जात आहे.

चिंतेचा विषय असा आहे की, तिरोडा तालुक्यात कोविड संशयतांची सोयी करिता जी व्यस्था करण्यात आली. त्याची निर्धारित संख्या २०० अशी आहे. तिरोडा तालुक्याने ही चरण सीमा गाठली असून पुढील व्यस्थेचा कोणतीही तजवीज आखली नसल्याने कोविड संशयितांची गैरसोय होत असल्याने नव्या निव्वड विलगिकरण केंद्राची गरज निर्माण झालेली आहे.
तिरोडा शहर आणि गावखेडयात अनेक प्रशस्त शाळा आणि एका महाविद्यालयाचा समावेश आहे. आणि सध्या कोविड १९ चे प्रादुर्भाव असल्याने शैक्षणिक दालने सर्व बंद आहेत. यांचा उपयोग केल्यास नवी विलगिकरन केंद्र तयार होवून संशयितांची सोय होऊन कोविड १९ चे रोखथांब आणि प्रतिबंध करण्यास आळा बसू शकतो.
याची दखल जिल्हा आपत्ती व्यसस्थापणाच्या सर्वेसर्वा जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक तालुक्यांकरिता करण्याची सोय होवून कोविड १९ प्रादुर्भाव नियंत्रण कक्षेत आणण्यास मदत होईल.

तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी कर्तव्य बजावीत असले तरीपण आपली समयसुचकता आणि सतर्कता पणाला लावीत नसून केवळ वरिष्ठांच्या आदेशाचीच वाट बघत असल्यानेही आपत्ती व्यस्थापणात गैरसोय होत आहे. यामुळे देखील आरोग्य विभागाचे वाभाळे निघत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. शाळा, महाविद्यालय आणि आरोग्य व्यस्थापन यांचेशी सल्ला मसलत करून व्यस्थापन करण्याची गरज पडली आहे.
गोंदिया जिल्ह्यात ८ तालुक्यांचा समावेश होतो. ८ ही तालुक्या करीता एकच रुग्णवाहिका असल्यानेही रुग्णांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. निदान प्रत्येक तालुक्या करीत अथवा अतिसंनवेदनशील तालुक्यांकरिता भाडे तत्त्वावरील रुग्ण वाहिनी सेविका उपलब्ध झाल्यास बऱ्यापैकी कोविड १९ रोखथांब करण्यास निर्बंध लावण्यास मदत होईल. तिरोडा येथील जनतेने कोविड १९ रुग्ण वाहिका वाढविण्याची मागणी केली आहे.

Previous articleतालुकात पुन्हा नवीन ७ कोरोना बाधित
Next articleतिरोडा शहरात उद्यापासून तीन दिवसाचा कर्फ्यू