Home अकोला उपविभागीय कुषी अधिकारी आकोट अंतर्गत (पोक्र) हवामान अनुकुल तन्ञन्ध्य शेती शाळा संपन्न

उपविभागीय कुषी अधिकारी आकोट अंतर्गत (पोक्र) हवामान अनुकुल तन्ञन्ध्य शेती शाळा संपन्न

180

 

अकोट शहर प्रतिनिधि
स्वप्नील सरकटे
आकोट तालुका कुषी विभागाच्या अधिकाय्रानी देवर्डा येथील गजानन पाटील अरबड यांच्या शेतात ५ आॅगस्ट रोजी शेती शाळा घेऊन सोयाबीन कपाशी पिकाचे निरीक्षण केले.आणि शेतकय्रांना कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण करण्याच्या दुष्टीकोणातुन उपाययोजना सुचविल्या तालुका कुषी अधिकारी कार्यालय आकोट अंतर्गत देवर्डा येथे सोयाबीन व कापुस पिकाचे नियमित सर्वेक्षण कसे घ्यावे याबाबत प्रात्यक्षिकासह शेतकय्रांना मार्गदर्शन केले कापुस पिकांवरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी नियमित सर्वेक्षण करून डोमकळया वेचुन अळीसह नष्ट कराव्या एकरी चार ते पाच कामगंध सापळे लावावे पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर रासायनिक फवारणी करण्यासाठी क्विनाॅलफाॅस २५ टक्के प्रवाही २५ मिली किंवा थायोडीकार्ब २० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी फवारणी सकाळी किंवा सायंकाळी करावी असे, मार्गदर्शन तालुका कुषी अधिकारी श्री शिंदे साहेब यांनी केले तसेच शेतीशाळेत निंबोळी अर्क घराच्या घरी कसा बनवावा याचे प्रात्यक्षिक कुषी सहायक सदांशिव साहेब यांनी करून दाखविले कामगंध सापळे लावतांना घ्यावयाच्या काळजीबाबत समूह साहायक उमेश अंभोरे साहेब यांनी मार्गदर्शन केले यावेळी मा उपविभागीय कुषी अधिकारी वाघमारे साहेब तालुका कुषी अधिकारी शिंदे साहेब यांनी उपस्थित शेतकय्रांना मार्गदर्शन केले.यावेळी सरपंच सौ. मिंलन अतुल खोडरे मंडळ कृषी अधिकारी आकोट १ चव्हाण साहेब कुषी साहायक सदाशिव साहेब समूह साहायक उमेश अंभोरे साहेब तालुका तंञज्ञान व्यवस्थापक दिपक मोगरे साहेब सहायक तंञज्ञान व्यवस्थापक राहुल अडाणी साहेब कुषी मित्र नारायन साबळे ,कुषी ताई खंडारे आणि गावातील शेतकरी उपस्थित होते.

Previous articleशासकीय कर्मचारी यांनी मुख्यालयी राहून सेवा घावी
Next articleतालुकात पुन्हा नवीन ७ कोरोना बाधित