चितळाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, चितळ घरात बंदिस्त वाटराणा येथील घटना..

प्रसेनजित डोंगरे
तालुका प्रतिनिधी गोंडपिपरी,
8275290099,
गोंडपिपरी तालुक्यातील धाबा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या वटराना गावात सायंकाळच्या सुमारास चितळाने घरातच महिलेला (निर्मला श्रीपद गेडाम वय 65) गंभीर जखमी केले असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोर चीतळला गावकऱ्यांनी जखमी महिलेच्या घरातच कोंडून ठेवले असून चीतळाला सोडण्यास गावकऱ्यांनी सक्त मनाई केली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील हे चीतळालाचे पाचवे प्रकरण असून वनधिकर्याच्या अलगर्जी पणामुळे वन्य प्राण्यांचा व मानवाचा जीव धोक्यात आला आहे. मागील आठवड्यात पोडसा येथे वनविभागाच्या दिरंगाई मुळे चीतळाला आपला जीव गमवावा लागला होता. तर सध्या वटराणा येथील महिला जीवन मरणाच्या दारात असून वनविभाग मात्र अजूनही ठोस पाऊल उचलले नसून गावकऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जोपर्यंत महिलेला पूर्वा स्थितीत बघणार नाही तोपर्यंत चीतळला घरातून सोडणार नसल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे. तर वन विभागातील वरिष्ठ कर्मचारी गृह जिल्ह्यात तळ ठोकून बसले आहेत, घटनास्थळी मात्र वन कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी धारेवर घेतल्याचा प्रकार सुरू आहे.