आज आणखी ५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले एकाची कोरोनावर मात जिल्ह्यात १९१ क्रियाशील रुग्ण एकूण बाधितांची संख्या ४६२

0
139

 

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी दखल न्यूज भारत..।।
गोंदिया दि.५ (जिमाका) कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात प्रचंड वेगाने वाढत आहे .आज ५ ऑगस्ट रोजी गोंदियाच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालात ५२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे निदान झाले.एक रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतला आहे.

आज आढळलेले ५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रूग्णांची संख्या ४६२ वर पोहचली आहे.तर क्रियाशील रुग्ण १९१ झाले आहेत.

जिल्ह्यात आज ५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. सर्वाधिक ३८ रुग्ण तिरोडा तालुक्यात आढळून आले आहे. मुंडिकोटा-१०, घोघरा-३, बेलाटी/ खुर्द-२३, गोंडामोहाडी -२ रुग्ण. सडक/ अर्जुनी तालुक्यात तीन रुग्ण आढळले असून दोन रुग्ण हे हैदराबाद येथून आणि एक रुग्ण हा ठाणे येथून आलेला आहे. ११ रुग्ण हे गोंदिया शहरात आढळले असून त्यापैकी रेलटोली-५, सिंधी कॉलनी -१, गात्रा-१, शास्‍त्री वार्ड -१ आणि तीन रुग्ण कुडवा येथील आहे.कोरोना बाधित रुग्ण दररोज आढळून येत असल्यामुळे कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या १९१ झाली आहे.

कोरोना या आजारावर मात करून आज एक रुग्ण घरी परतला आहे. तो रुग्ण तिरोडा येथील आहे.आतापर्यंत २४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण १०२९१ नमुने पाठविण्यात आले. यामध्ये ९५७५ नमुने निगेटिव्ह आढळून आले .४३१ नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे.१४१ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित आहे.तर १४४ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे.

जिल्ह्याचे चार कोरोना बाधित रुग्ण हे जिल्ह्याबाहेर बाधित आढळले.गोंदिया येथील प्रयोगशाळेतून ४३१ आणि रॅपिड अँटिजेन टेस्टमधून २७ असे एकूण ४६२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.

संस्थात्मक विलगिकरण कक्षात १९९ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात ९२७ व्यक्ती अशा एकूण ११२६ व्यक्ती विलगिकरणात असून ह्या सर्व व्यक्ती प्रशासनाच्या देखरेखीखाली आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांची भेट घेऊन त्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करीत आहे.

कोरोना बाधित रुग्णांचा तात्काळ शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३०४५ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले.यामध्ये ३०१८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.२७ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १५६ चमू आणि ७४ सुपरवायझर ६० कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे.

जिल्ह्यातील ज्या गावात आणि आणि नगर पालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे तो भाग कंटेंटमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे.

क्रियाशील कॅटेंटमेंट क्षेत्र ६० आहे.यामध्ये गोंदिया तालुक्यात चांदणीटोला,कुडवा,गोंदिया येथील यादव चौक,सिव्हिल लाईन, रेल्वे लाईन,श्रीनगर व सिंधी कॉलोनी. सालेकसा तालुक्यातील भजेपार, पाउलदौना,रामाटोला व तितेपार. देवरी तालुकयातील आखरीटोला भागी,परसटोला,गरवारटोली व नवाटोला, देवरी शहरातील वार्ड क्रमांक ५,८,९,१०.सडक/अर्जुनी तालुक्यातील हलबीटोला,डव्वा व काटेकुर्रा.गोरेगाव तालुक्यातील घोटी.

तिरोडा तालुक्यातील वडेगाव, मुंडीकोटा,सतोना,लाखेगाव,माली, लोणार,खैरबोडी,गुमाधावडा,वडेगाव-२,गोंडमोहाडी,पाटीलटोला,इसापूर,
सेजगाव,पालडोंगरी,पिपरिया,उमरी,
पांजरा,मुंडीकोटा,घोघरा,सरांडी,
वडेगाव,मुंडीकोटा रेल्वे स्टेशन, बयाबाब(मुंडीकोटा),तिरोडा शहरातील न्यू सुभाष वार्ड,किल्ला वार्ड, नेहरू वार्ड,गुरुदेव वार्ड,महात्मा गांधी वार्ड,,रवींद्र वार्ड,लक्ष्मी वार्ड ,महात्मा फुले वार्ड व न्यू बेलाटी/खुर्द.

अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी, सिंगलटोली, ताडगाव व वडेगाव आणि आमगाव तालुक्यातील तिगाव आणि चिरचाळबांध आदी गावे आणि वार्ड कंटेनमेंट क्षेत्रामध्ये आहे.

*काळजी घ्या*
*अंतर ठेवा*
*मास्क बांधा*
*सुरक्षित राहा*