मुग पिकावर आलेल्या अज्ञात रोगामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, युवासेनेची प्रशासनाकडे मागणी

दर्यापूर(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
कोरोना या महामारीने संपुर्ण जगाला वेठीस आहे रोजगारावर मोठे संकट ठाकले आहे
दर्यापूर तालुक्यात मोठया प्रमाणात मुगाचा पेरा शेतकरीवर्गाने केला आहे मात्र या पिकावर आलेल्या अज्ञातरोगामुळे तालुक्यातील शेतकरी शेतकरी संकटात सापडून हवालदिल झाला आहे मुगाचे पिक हे सर्वात कमी दिवसाचे पिक आहे पिके चांगली असताना अचानक या पिकावर व्हायरस आला व त्यामुळे शेतात उभे असलेले पिक हे सुकून वाळून गेलेत पिक सुधारावे म्हणून काही शेतकऱ्यांनी यावर फवारणीही केली मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही या पिकाला मोडल्याशिवाय दुसरा इलाज नव्हता
एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे मुगाच्या पिकावर आलेला अज्ञात रोग यामुळे शेतकरीवर्गाच्या डोळ्यासमोर असलेली आशा पार धुळीस मिळाली आहे चारही बाजुनी संकटात सापडलेल्या बळीराजाला सरकारने मदतीचा हात देणे गरजेचे आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी अशी मागणी युवासेने नेते प्रतिक पाटील लाजूरकर यांनी प्रशासनला केली आहे