आमगावचा संजय घोरमोडे ठरला नागपूर विद्यापीठाच्या उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराचा मानकरी आ.कृष्णा गजबे यांनी घरी जाऊन केले अभिनंदन

 

पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
देसाईगंज/वडसा
दखल न्यूज भारत

देसाईगंज- गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील संजय मोहन घोरमोडे हा विद्यार्थी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराचा मानकरी ठरला आहे शिक्षण ,क्रीडा, कला व अन्य क्षेत्रात निपुण असलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून दरवर्षी उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित केले जाते नागपूर विद्यापीठात गोंदिया भंडारा वर्धा या सर्व जिल्ह्यातील महाविद्यालयांचा समावेश आहे या शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा उत्कृष्ट विद्यार्थी निवडण्याची प्रक्रिया करण्यात आली त्यात देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील विद्यार्थी संजय मोहन घोरमोडे हा या पुरस्काराचा मानकरी ठरला तेव्हा आ.कृष्णा गजबे यांनी घरी जाऊन त्याचे शाल व गुलाबाचे फुल देऊन त्याचे अभिनंदन केले व त्याच्या पुढील शिक्षणासाठी त्याला शुभेच्छा दिल्या तेव्हा आमगाव येथील माजी सरपंच योगेशजी नाकतोडे,वसंतराव ठाकरे माजी जि प सदस्य,देविदास जी ठाकरे उपस्थित होते.