येवदा परिसरात रेती माफियांच्या आवळल्या मुसक्या कार्यरत महिला तलठ्याची उत्कृष्ट कामगिरी

163

 

गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्र राज्यात वाळूचा लिलाव झाला नाही या बाबीचा फायदा घेत वाळूतस्करांनी अवैध रेती उत्खनन करण्याचा सपाटा महाराष्ट्रभर लावलेला आहे त्यातच काही हुशार वाळू तस्कर कायद्याच्या कचाट्यातून वाचण्याकरिता नवीन फंडे शोधून काढत असतात
मध्यप्रदेशातून ट्रक द्वारे रेती बोलावून सरकारी जागांवर त्यांचा साठा केला जातो व त्यात काळी रेती मिक्स करून परिसरात अव्वाच्या सव्वा भाव घेऊन विकली जाते. त्यांच्याकडे रेती साठवण्याचा कुठलाच परवाना नसतो परंतु मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात वाहतूक करून आणलेल्या ट्रकची टीपी ही परवाना म्हणून अधिकाऱ्यांना दाखवण्यात येते
साठवलेला रेतीची विक्री ही ट्रॅक्टर द्वारे केली जाते अधिकाऱ्यांच्या नजरेत येऊ नये म्हणून रेती भरलेल्या ट्रॉलीवर वरून डस्ट किंवा गिट्टी चा थर टाकला जातो अशाप्रकारे रेतीची अवैध वाहतूक दिवसाढवळ्या केली जाते
गेल्या महिन्यात तहसीलदार दर्यापूर यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांच्या आदेशावरून तालुक्यातील संपूर्ण गावात वाळू तस्करी ला आळा घालण्याकरीता ग्राम दक्षता समितीची स्थापना केली आहे यात ज्या ठिकाणी अवैध वाळू साठे किंवा अवैध वाळू वाहतूक होत असेल त्यावर ग्राम दक्षता समितीने गावातील अवैध वाळू वाहतूक थांबवावी याकरिता त्यांना अधिकार दिले
अशातच काल येवदा येथे कार्यरत तलाठी कासारकर मॅडम व कोतवाल रणजित काळे यांनी रोडच्या कडेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत साठवून ठेवलेल्या रेतीचा पंचनामा करून त्याबाबतचा अहवाल तहसीलदार दर्यापूर यांना पाठवण्यात आलेला आहे तलाठी यांनी केलेल्या कारवाईमुळे अवैध रेती विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या समूहामध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे नक्कीच अवैध रेतीची वाहतूक व विक्री थांबेल अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.