पंचायत समिती आरमोरी च्या बाजूला असलेल्या 0.25 हेक्‍टर आर नगरपरिषद मालकीच्या जागेवर नवीन नगर परिषद प्रशासकीय इमारत बांधकामासाठी जागा राखीव ठेवा. नगरसेवक मिलिंद खोब्रागडे

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

आरमोरी दि 5 ऑगस्ट-
आरमोरी हे शहर जिल्ह्याच्या राजकारणाचे माहेरघर मानले जाते आणि धार्मिक दृष्ट्या सुद्धा आरमोरी चे महत्व अधिक आहे अशा या आरमोरी ला ग्रामपंचायत वरून नगरपंचायत आणि कोर्टाच्या निर्णयानुसार पुढे नगरपरिषद असा लांबचा पल्ला ओलांडलेली आणि याच ग्रामपंचायतने लहान कार्यकर्त्यांना मोठे करून नेते बनवलेली ही ग्रामपंचायत कालीन इमारत आता फार जुनी झाली आहे परंतु तात्पुरती सोय म्हणून पुन्हा काही दिवस ही इमारत डौलात उभी राहावी म्हणून त्या इमारतीवर आणि फर्निचर व इतर सोयी सुविधांसाठी नगरपरिषद ने 25 लाख रुपये खर्च करून त्या इमारतीला एका 40 ते50 वर्षाच्या म्हातारीला नववधूप्रमाणे सजवण्याचे नटवण्याचे काम सुरू आहे परंतु ती काही वेळापुरता जरी ती नटून डौलात उभी असली तरी पण ती नेहमीसाठी साथ देणारी नाही त्यामुळे ही इमारत कधीही मोडकळीस येऊ शकत असल्यामुळे आता काळानुसार नवीन इमारत बांधावी लागणार आहे. दिवसेंदिवस नगरपरिषदेची लोकसंख्या वाढत असल्याने आणि कर्मचारी व त्यांच्या विभागांना त्याचप्रमाणे जनतेने निवडून पाठवलेल्या प्रतिनिधींना,येणाऱ्या नागरिकांना प्रशस्त जागा व्हावी म्हणून नगरपरिषदेला एक प्रशस्त इमारत बांधावेच लागेल या सर्व गोष्टींचा एकंदर विचार करता आज सध्या असणारे नगरपरिषदेच्या इमारतीची जागाही अपुरी पडत असल्याने आरमोरी नगरपालिकेच्या हद्दीत आणि नगरपरिषद ला हस्तांतरित असणारी पंचायत समिती आरमोरी च्या बाजूला असलेली 0.25 हेक्टर ( बोळी) खुली जागा ज्यात सध्या अभ्यासिका आणि संरक्षण भिंतीचा काम चालू आहे, त्या ठिकाणी नगरपरिषद इमारत बांधकाम अगदी व्यवस्थित आणि सुटसुटीत पद्धतीने बांधता येईल तसेच जागा प्रशस्त असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था करता येईल तसेच शहराच्या मध्यभागी असल्याने सर्वांना सोयीस्कर होईल एवढेच नव्हे तर त्यात एक छोटा गार्डनही बनवता येईल आणि ही जागा महामार्गावर लागून असल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही, जागा भरपूर असल्यामुळे कसल्याच प्रकारची अडचण भासणार नाही तसेच समोरील भाग हा गडचिरोली नागपुर हायवे ला लागला असल्यामुळे आणि मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे त्या जागी बेरोजगार लोकांच्या हाताला काम मिळावा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना योग्य त्या पद्धतीने गाळे काढून ते किरायाने देता येईल त्यामुळे नगरपरिषदेच्या आर्थिक व्यवहारात सुद्धा भर पडेल.अशा विविध उपयोगी जागेचे महत्त्व जाणून त्याची योग्य त्या पद्धतीने नियोजन करून ही जागा नगरपरिषद इमारतीसाठी राखीव ठेवावी अशी मागणी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी केलेली आहे.