ऋषी सहारे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत
कोरची:- मागील दीड महिन्यापासून कोरची तालुक्यात विजेची समस्या असून तालुक्यातील किती गावांना विद्युत सेवेचा नेहमीच फटका बसतो आहे तसेच 4g, 5g डिजिटल युगात कोरची तालुक्यात 2g चे पण लाभ मिळत नसल्याने तालुक्यातील जनतेचे पिक कर्ज, ऑनलाईन सातबारा, ऑनलाइन शिक्षण असे विविध ऑनलाईन कामे रखडली आहेत. विद्युत सेवा व दूरसंचार सेवा खूपच कमी ठरल्यामुळे कित्येक शेतकरी पीक कर्जासाठी अर्ज करू शकले नाही. या वर्षी पावसाने येथील दडी मारल्यामुळे कोरची तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा. अशा मागण्यांसह कोरची तालुक्यातील सर्वपक्षीय तालुका विकास आंदोलन समितीच्या वतीने कोरची कुरखेडा मार्गावरील झंकार गोंदी फाट्याजवळ बेमुदत चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
गडचिरोली येथील विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंताअनिल बोरसे व कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी या आंदोलनात येऊन आंदोलन करते सोबत चर्चा केली परंतु ते समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यामुळे त्यांना परत पाठविण्यात आले तसेच भारतीय दूरसंचार निगम गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हा प्रबंधक यशवंतराव घोणाडे वडसा येथील कनिष्ठ दूरसंचार अभियंता आशिष डोंगरे यांना ही माघारी जावे लागले. तालुक्यात नेहमी विकासाच्या नावाखाली डावलल्या जाते. दिवसाला 16 ते 18 तास विद्युत सेवा खंडित असते अशा परिस्थितीत तालुक्यातील नागरिक अशा प्रकारे आपले दिवस काढतात हे समजणं खूप कठीण आहे.
बातमी लिहीपर्यंत आंदोलन करते समाधान न झाल्यामुळे बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे . या आंदोलनात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे सर्वपक्षीय तालुका विकास आंदोलन समितीचे कोरची चे अध्यक्ष शामराव मडावी, उपाध्यक्षनसरुद्दिन भामानी , सचिव नंदकिशोर वैरागडे, सहसचिव आनंद चौबे, कोषाध्यक्ष मनोज अग्रवाल, पंचायत समिती सभापती श्रावण मातलाम तसेच बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.