कारंजा येथे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कार्य करणार्‍या आशा वर्कर्सचा सत्कार पुरोगामी पञकार संघनेचा पुढाकार जिल्हाध्यक्ष फुलचंद भगत यांच्या प्रमुखहस्ते सन्मानपञ वितरण

113

 

कारंजा(वाशिम)-कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक दायित्व निभावून कार्य करणार्‍या कर्तुत्ववान आशा वर्कर्स यांचा महाराष्ट पुरोगामी पञकार संघाकडुन “कोरोना योध्दा’म्हणून सन्मानपञ देवुन जिल्हा अध्यक्ष फुलचंद भगत यांचे हस्ते वितरीत करन्यात आले.
सध्या कोरोना संक्रमन आजाराने सर्वञ थैमान घातले असुन जनजीवनही विष्कळीत झाले आहे.संपूर्ण देशात कोरोना आजाराचा झपाट्याने फैलाव होत असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे.या आजाराला आळा घालण्यासाठी पोलिस ,डाॅक्टर्स, परिचारिका, सफाई कामगार व विविध विभागांचे अधिकारी जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत. याच उदात्त भावनेतून कारंजा येथील स्वयंसेवी आणी सामाजीक कार्यकर्त्यांचेही कार्य ऊल्लेखनिय आहे.या कार्याची ईतरांनीही प्रेरणा घेणे जरुरीचे आहे.कोरोणाविषयक जनजागृती,विविध माध्यमातुन मदत,प्रशासनाशी समन्वय या बाबींची दखल घेवुन महाराष्ट पुरोगामी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात आणी वाशिम जिल्हा अध्यक्ष फुलचंद भगत यांचे ऊपस्थीतीत कारंजा तालुक्यातील आशा वर्कर्स आणी बचतगटातील महिलांचा ‘कोरोना योध्दा’सन्मानपञ देवुन सत्कार करन्यात आला.यावेळी पञकार बांधवासह आशा वर्करची ऊपस्थीती होती.