विद्यार्थिनीने शेतकर्यांना केले फवारणी बाबत मार्गदर्शन -मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम

वणी : परशुराम पोटे

जिल्हात दोन वर्षापुर्वी अनेक शेतकर्यांचा फवारणी करतेवेळी विषबाधा होऊन मृत्यू झाला. असा प्रकार पुन्हा घडु नये म्हणून मारोतराव वादाफळे क्रुषी महाविद्यालयाची विद्यार्थीनी शीतल झाडे हीने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत तालुक्यातील बोर्डा येथिल शेतकर्यांना फवारणी करते वेळी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात मार्गदर्शण केले.
फवारणी करत असतांना संरक्षण कपडे घालावे, नाकावरील मास्क व चश्मा वापरावा, फवारणी करतांना औषध अंगावर उडनार नाही याची काळजी घ्यावी,चेहरा निट बांधून घ्यावा,
फवारणी शक्यतो हवेचा प्रवाह मंद असतांना करावी. जखमी व्यक्तींनी फवारणी करू नये, फवारणी केल्यानंतर मनूष्य तसेच जनावरांना प्रवेश करू देऊ नये,तसेच शेतकर्यांना फवारणी करतेवेळी विषबाधा झाल्यास सर्वात प्रथम त्याचा स्वाच्छोस्वास सुरळीत चालू आहे की नाही हे तपासावे व त्याला डॉक्टर कडे न्यावे ईत्यादी सल्ले विद्यार्थीनी शीतल झडे हिने शेतकर्यांना दिले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.ए ठाकरे व उपप्राचार्य एम.व्ही.कडू व पाध्यापक कुनाल गावंडे सर यांचे मार्गदर्शन लाभले प्रात्यक्षीकाला गावातील मंगेश झाडे,मारोती दरेकर, विठ्ठल ठाटे,विनोद काकडे, कुंडलिक पायघन, मारोती वाघाडे, अविनाश जीवतोडे,मारोती घागी, नथ्थू टोंगे,सतीश डोहे, गजानन काकडे,बाळू टोंगे, विजय बोधणे,नरेंद्र पानघाटे,रवींद्र पिंपळशेंडे, विनोद खामनकर, संदेश झाडे दत्तू वाघाडे,राजू वाघाडे ईत्यादी ग्रामस्थ उपस्थीत होते.