दहीवेल–पिंपळनेर रोडवरील,अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जागीच ठार.. — साक्री पोलीस स्टेशन अंतर्गत भादवी कलम- 304(अ),279,337,338,मो वा का क 184,134/177 प्रमाणे गुन्हा नोंद.

0
277

छगन कोळेकर
ता.प्र.साक्री,जि.धुळे 9823812416
दहीवेल ते पिंपळनेर रोडवर सप्तरशृंगी मंदीराच्या पुढे,सकाळी अंदाजे ७ वाजताच्या दरम्यान एका अज्ञात वाहन चालकाने,अज्ञात युवकास ठोस मारुन जागीच ठार केल्याची घटना घडली.अपघाता नंतर वाहन चालक हा वाहना सोबत फरार झाला आहे.
अज्ञात मृतकाचे वय अंदाजे ३५ वर्षाचे असून,तो सडपातळ आहे व त्याचा चेहरा दबलेला आहे.
अपघाताचा पुढील तपास अंमलदार असई- के एम दामोदर करीत आहेत.