कोव्हीड योद्धा सन्मानपत्र देऊन पत्रकार सुनील साळवे यांचा सन्मान

294

 

मंदार बावनकर / आशिष थूल
दखल न्युज भारत टीम नागपुर

नागपुर : ५ आँगस्ट २०२०.
महाराष्ट्रातील ख्यातनाम सामाजिक संघटना *जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संघटना तसेच माँ रेणुका स्कूल आँफ नर्सिंग, भातुकली जि. अमरावती तर्फे दखल न्युज भारत पोर्टल व यु ट्युब चैनल चे कार्यकारी संपादक सुनील साळवे यांना कोव्हीड योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित केले आहे.
मागील मार्च २०२० पासून दखल न्युज भारत चे कार्यकारी संपादक सुनील साळवे (पत्रकार) यांनी कोरोना या वैश्विक महामारीत स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता समाजाच्या प्रत्येक घटकाच्या समस्येला न्याय व वाचा फोडण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. आज दखल न्यूज भारत पोर्टल चैनल ला संपुर्ण महाराष्ट्रात सर्वात वेगवान गतीने पुढे नेण्यासाठी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांची दखल घेत जनसामान्यांचा आवाज पत्रकार सुनील साळवे यांनी आपल्या लेखनीतुन बुलंद केला आहे. आज दखल न्यूज भारत च्या वेबसाईट ला ५० लाखांच्या वर वाचकांनी भेट दिली त्यात पत्रकार सुनील साळवे यांचे बहुमुल्य योगदान आहे.
पत्रकार सुनील साळवे यांच्या या बहुमुल्य कार्याची दखल घेत जय संघर्ष वाहन चालक मालक संघटना चे संस्थापक अध्यक्ष मा. संजय जी हळणोर, राज्य अध्यक्ष प्रवीण वाघ तसेच माँ रेणुका स्कूल आँफ नर्सिंग स्कूल चे अध्यक्ष देवेंद्र रामटेके आणि सचिव सौ. नीता मेश्राम यांनी दखल न्यूज भारत पोर्टल व यु ट्युब चैनल चे कार्यकारी संपादक सुनील साळवे यांना कोव्हीड (कोरोन) योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. ग्राऊंड झिरो लेवलवर जाऊन प्रत्यक्षात बातम्या कलेक्ट करुन वाचकांपर्यंत नियमित अपडेट्स पोहोचवत आहेत.