शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेले १०जुलै २०२० रोजीची अधिसूचना रद्ध करावी- आ.कृष्णा गजबे

 

पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
देसाईगंज/वडसा
दखल न्यूज भारत

देसाईगंज-दिनांक: ०५/०८/२०२० शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १० जुलै २०२० रोजी अधिसूचना जाहीर केलेली आहे ह्या अधिसूचना रद्द कराव्यात. महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली १९८१ मधील सेवाशर्ती मध्ये बदल सुचवणार ही अधिसूचना अन्यायकारक आहे. या अधिसूचनेत सुचविल्या प्रमाणे बदल झाल्यास राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त लाखो मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा जुनी पेन्शन मिळण्याचा अधिकार हिरावला जाणार. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला २०२० साली नियमावलीत बदल करून पंधरा वर्षे मागे जाऊन पूर्वलक्षी प्रभावाने आणि त्यांची अंमलबजावणी करायची आहे, त्यामुळे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी जुन्या पेन्शनच्या हक्कापासून वंचित राहणार नाही ही अधिसूचना रद्ध करावी, याबद्धल आ. कृष्णा गजबे आरमोरी वि. स. क्षेत्र यांना निवेदन देतांना, शिक्षक भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटनेचे विभागीय अध्यक्ष भाऊराव जी पत्रे, विष्णुजी दुणेदार देसाईगंज, तालुकाध्यक्ष व शिक्षक भारती विभागाचे समस्त पदाधिकारी उपस्थित होते.