आष्टी-चामोर्शी रोडवरील उमरी गावाजवळ ट्रकने दुचाकी स्वाराला चिरडले. दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू.

 

प्रतिनिधी प्रविन तिवाडे
आष्टी- आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास आष्टी चामोर्शी रोडवरील उमरी गावाजवळ ट्रकने दुचाकी स्वाराला चिरडले यात दुचाकीस्वार सुभाष हरिचरण अधिकारी वय 50 रा.रामकृष्णपूर ता. चामोर्शी जि. गडचिरोली याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.MH33 H 6171 क्रमांकाच्या दुचाकीने मृतक कोनसरी कडून आष्टीकडे येत होता.उमरी गावाजवळ ट्रक क्र. TN52 L 9168 ने दुचाकीला धडक दिली. ट्रकच्या मागच्या चाकात दुचाकी आल्याने मृतकाचा जागीच मृत्यू झाला.घटनेचा पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहे.