दर्यापूर आगारातून दर्यापूर-अमरावती बससेवा सुरु, एस टी महामंडळाचा निर्णय, आगारप्रमुखांची माहिती

247

दर्यापूर(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
दि 22 मार्चपासून बंद असलेली परिवहन महामंडळाची बससेवा आज दि 5 ऑगस्टपासून सुरु न असून या अंतर्गत आजपासून प्रवाश्यांच्या सोयीसाठी दर्यापूर-अमरावती बससेवा सुरु करण्यात आली असून याचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे अशी माहिती दर्यापूर आगाराचे आगारव्यवस्थापक श्री जयकुमार इंगोले यांनी दिली

दर्यापूर-वलगाव बससेवा यापूर्वीच सुरु करण्यात आली होती परंतु अमरावतीला जाणाऱ्या प्रवाशांना वलगाववरुन जावे लागत असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता प्रवाशांची हि अडचण लक्षात घेऊन दर्यापूर-अमरावती हि बससेवा सुरु करण्यात आली आहे याबाबत विभागीय कार्यालयाशी चर्चा करण्यात आली आहे
दर्यापूरवरुन अमरावतीसाठी सुटणाऱ्या बसेसचे वेळापत्रक
सकाळी 7 ,8 ,9 ,10 वाजता
दुपारी 1 व 2 वाजता
दर्यापूर येथून सुटतील तर मालवाहू बससेवा दुपारी 1 वाजता देण्यात येत असून दोन मालवाहक बस दर्यापूर आगारातुन सोडण्यात येईल या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन आगार प्रमुख श्री जयकुमार इंगोले यांनी प्रवाशी वर्गाला केले आहे