जिल्हा प्रतिनिधी गुरूप्रसाद कुलकर्णी
पंढरपूर // प्रतिनिधी
आज संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या तसेच ऐतिहासिक महापवित्र आशा श्रीराम मंदिराचे भूमिपूजन भारत देशाचे चे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेबांच्या शुभहस्ते श्री क्षेत्र अयोध्या येथे संपन्न झाले आहे. याच वेळी संपूर्ण भारताबरोबरच महाराष्ट्रातूनही आपापल्या स्थानिक श्रीराम मंदिरांमध्ये जाऊन सर्व तेथील महाआरती केली आहे. याचेच औचित्य साधून पंढरपूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी २५० वर्षापूर्वी स्थापन केलेल्या श्रीराम मंदिरामध्ये आज पंढरपुरातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकार प्रदेशाध्यक्ष तथा शाडो कॅबिनेट मंत्री दिलीप (बापू) धोत्रे यांनी श्रीरामाची महाआरती केली.
पंढरपूर मधील प्राचीन अशा या श्री राम मंदिरामध्ये प्रथमच मुस्लिम समाजाने या मारुती मध्ये सहभाग नोंदवला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकार प्रदेशाध्यक्ष तथा शाडो कॅबिनेट मंत्री दिलीप (बापू) धोत्रे यांच्यासोबतच ह.भ.प. राजेंद्र महाराज मोरे, आदित्य फत्तेपुरकर, श्याम गोगाव सर, गणेश पिंपळनेरकर, समीर बेंद्रेकर आदि सर्व मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.