जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा देसाईगंज तालुक्यातील आमगाव चा संजय मोहन घोरमोडे ठरला नागपूर विद्यापीठाच्या उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराचा मानकरी

453

 

पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
देसाईगंज/वडसा
दखल न्युज भारत

आमगाव – शिक्षण, क्रीडा, कला व अन्ये क्षेत्रात निपुण असलेल्या विध्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून दरवर्षी उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित केले जाते. नागपूर विद्यापीठात नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा या सर्व जिल्ह्यातील महाविद्यालयांचा समावेश आहे. या शैक्षणिक सत्रात सुद्धा उत्कृष्ट विद्यार्थी निवडण्याची प्रकिया करण्यात आली. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील विद्यार्थी संजय मोहन घोरमोडे हा या पुरस्काराचा मानकरी ठरला. संजय हा शासकीय विज्ञान संस्था नागपूर येथे शिक्षण घेत आहे. शिक्षण, क्रीडा, कला व अन्य क्षेत्रात सुद्धा त्याची कामगिरी अव्वल राहीलेली आहे. त्याचे सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण जवाहर नवोद्य विद्यालय घोट येथे झाले. तिथे असताना सुद्धा त्याची खो-खो खेळात दोन वेळा राष्ट्रीय पातळीवर निवड झाली होती. सोबतच बारावीत सुद्धा क.महाविद्यालयातून दुसरा क्रमांक पटकाविला होता. गडचिरोली जिल्ह्यातून नागपूर येथे शिक्षणासाठी गेल्यानंतर नागपूर विद्यापीठाच्या उत्कृठ विद्यार्थी पुरस्काराचा मान पटकावने हे जिल्हा वासियांसाठी भूषनावह बाब आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होऊ शकणार नाही. त्यामुळे संजय घोरमोडे याची घोषणा ऑनलाईन पद्धतीने झाली आहे. कोरोना चा प्रादुर्भाव संपल्यावर कुलगुरू च्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येतील. या पुरस्काराचे खरे मानकरी माझे आई वडील आहेत ज्यांनी “शेतात राब-राब राबून, जीवाचे हाल करून,” “उन्हाचे चटके खाऊन” माझ्या शिक्षणासाठी पूर्णपणे मदत केली. “मी नाही शिकलो तर, माझे स्वप्न माझा मुलगा पूर्ण करेल” असे संजय घोरमोडे यांनी सागितले. पुरस्काराबद्धल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.